WTC फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने, इंग्लंडच्या दिग्गजाला सहनच होईना, म्हणाला, माझा पॉईंट टेबलवरच आक्षेप!

| Updated on: May 13, 2021 | 1:30 PM

WTC चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. (England Stuart Broad Question WTC point System India vs New Zealand )

WTC फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने, इंग्लंडच्या दिग्गजाला सहनच होईना, म्हणाला, माझा पॉईंट टेबलवरच आक्षेप!
स्टुअर्ट ब्रॉड
Follow us on

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या तुल्यबळ संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship) अंतिम सामना रंगणार आहे. साऊथहॅम्पटनच्या ग्राऊंडवर 18 ते 23 जूनदरम्यान हा महामुकाबला होणार आहे. इंग्लंडमध्ये हा सामना होणार होतोय. पण ग्राऊंड इंग्लंडचं, प्रेक्षक इंग्लंडचे आणि सामना खेळणारे 2 दुसरे देश…. इंग्लंडच्या खेळाडूंना हे सहन कसं होईल? इंग्लंडचा जगविख्यात गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) WTC च्या फायनलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुळात माझा WTC च्या गुणतालिकेवरच आक्षेप आहे, असं स्टुअर्ट ब्रॉडने म्हटलं आहे. (England Stuart Broad Question WTC point System India vs New Zealand)

इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या पॉईंट सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून भारत वगळता इतर संघांपेक्षा जास्त सामने जिंकूनही इंग्लंडला पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडपेक्षा 4 सामने कमी जिंकलेल्या न्यूझीलंडचा संघ भारताबरोबर अंतिम सामना खेळत आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये भारताने 12 सामने जिंकले आहेत तर 4 गमावले असून 1 सामना ड्रॉ केला आहे. त्याचबरोबर, भारताबरोबर अंतिम फेरी गाठणारा न्यूझीलंडने केवळ 7 सामने जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडपेक्षाही 1 कसोटी सामना अधिक जिंकला आहे. त्याचवेळी इंग्लंडने 4 सामने अधिक जिंकले आहेत. तर तेथे 7 सामन्यांत पराभव स्वीकारुन 3 सामने ड्ऱॉ केले आहेत.

ब्रॉडचा गुणतालिकेवरच आक्षेप

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या गुणतालिकेवरच स्टुअर्ट ब्रॉडने आक्षेप नोंदवलाय. मला समजत नाही हे नेमकं काय होतंय. 5 सामन्यांची अ‍ॅशेस कसोटी मालिका बांग्लादेश विरुद्ध भारत यांच्यादरम्यान खेळल्या जाणार्‍या 2 कसोटी सामन्याइतकी कशी असू शकते?. या कल्पनेत काहीतरी चूक आहे, ज्यावर ठोस काम करणं आवश्यक आहे, असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.

भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल

WTC चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. हा सामना पहिल्यांदा लॉर्ड्स येथे होणार होता, परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता हा सामना साऊथॅम्प्टन येथे हलविण्यात आला.

(England Stuart Broad Question WTC point System India vs New Zealand)

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण प्रश्न मिटला, आताच्या कर्णधाराचीही संमती!

Hardik Pandya : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये शाळा सोडली, आज पोत्याने पैसा, करोडोंच्या गाड्या आणि लाखोंची घड्याळं वापरतो!

Video : मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे, WTC च्या फायनलसाठी जाडेजाने कंबर कसली, खास व्हिडीओ पोस्ट