ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण प्रश्न मिटला, आताच्या कर्णधाराचीही संमती!

स्मिथवरील बंदी हटल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली जावी म्हणून मागणीने जोर धरला आहे. (Tim Paine Support Steve Smith Australian Captaincy)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण प्रश्न मिटला, आताच्या कर्णधाराचीही संमती!
टीम पेन आणि स्टीव्ह स्मिथ

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) निवड होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या चर्चेत आणखी हवा भरली आहे ती ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलायची वेळ येईल तेव्हा माझा पाठिंबा स्टिव्ह स्मिथला असेल, असं म्हणत टीम पेनने चर्चेत आणखीनच रंग भरला आहे. टीम पेनने 2018 साली कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. जोहान्सबर्गमध्ये 2018 साली बॉल टेम्परिंग प्रकरणामध्ये स्मिथ दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती, ज्यानंतर टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णदापपदाची सूत्रे हाती घेतली होती. (Tim Paine Support Steve Smith Australian Captaincy)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण प्रश्न मिटला

स्टीव्ह स्मिथने पुन्हा कर्धार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पुन्हा कर्णधारपदाची सूत्रे हाती घ्यायला मला नक्की आवडेल तसंच मी उत्सुक देखील आहे, असं स्टिव्ह स्मिथने म्हटलं होतं. आता ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कर्णधार टीम पेनने देखील स्टीव्ह स्मिथच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर किंबहुना त्याला पाठिंबा दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार स्टीव्ह स्मिथ असेल, हे जवळपास निश्चित झालंय.

टीम पेन काय म्हणाला?

स्टीव्ह स्मिथकड पुन्हा कर्णधारपदाची धुरा सोपवावी, असं मला वाटतं पण हे माझ्या हातात नाहीय. मी जेव्हा स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळलो, तेव्हा मला तो एक चांगला कर्णधार भासला. त्याचा खेळ अप्रतिम आहे, असं टीम पेन म्हणाला. स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना टीम पेनने वरील वक्तव्य केलं.

कर्णधार म्हणून माझा स्टीव्ह स्मिथला पाठिंबा

“स्मिथच्या नेतृत्वात सर्व काही व्यवस्थित सुरु होते. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची घटना घडली आणि त्याच्यााकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. पण हो, त्याला पुन्हा कर्णधार बनवण्याविषयी चर्चा झाल्यास माझा पाठिंबा त्याला नक्की आहे.”

स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा सोपवा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंची मागणी

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची सूत्रे हातात घ्यावीत म्हणून सारखी वक्तव्य करीत आहेत. स्मिथवरील बंदी हटल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली जावी म्हणून मागणीने जोर धरला आहे. या मागणीने जोर धरला जेव्हा ऑस्ट्रेलियाला भारताकडून त्यांच्याच भूमीत पराभव स्वीकारावा लागला. गाबावर 32 वर्षांनी भारताने ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवली.

हे ही वाचा :

Video : मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे, WTC च्या फायनलसाठी जाडेजाने कंबर कसली, खास व्हिडीओ पोस्ट

Hardik Pandya : शाळेची फी भरायला पैसे नव्हते, नववीमध्ये शाळा सोडली, आज पोत्याने पैसा, करोडोंच्या गाड्या आणि लाखोंची घड्याळं वापरतो!