इंग्लंडचंही सेमीफायनलचं तिकीट बूक, न्यूझीलंडची धाकधूक वाढली

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला इंग्लंडने अवघ्या 186 धावात गुंडाळून 119 धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. सुरुवातीला तुफान फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडची धाकधूक मात्र आता वाढली आहे. कारण, चौथ्या क्रमांकाचा संघ आता बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर ठरणार आहे.

इंग्लंडचंही सेमीफायनलचं तिकीट बूक, न्यूझीलंडची धाकधूक वाढली
Follow us
| Updated on: Jul 03, 2019 | 11:11 PM

लंडन : जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या सलामीवीर जोडीची तुफान फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांची कमाल या जोरावर इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. न्यूझीलंडला इंग्लंडने विजयासाठी 306 धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला इंग्लंडने अवघ्या 186 धावात गुंडाळून 119 धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. सुरुवातीला तुफान फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडची धाकधूक मात्र आता वाढली आहे. कारण, चौथ्या क्रमांकाचा संघ आता बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर ठरणार आहे.

इंग्लंडच्या सलामीवीर जोडीने पुन्हा एकदा कमाल केली. जॉनी बेअरस्टो याने 106 धावांची, तर जेसन रॉयने 60 धावांची खेळी करुन धडाकेबाज सुरुवात केली. पण यानंतरच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे इंग्लंड 400 चा टप्पा पार करण्याची स्थिती असताना 305 धावा करता आल्या. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 42 धावांचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी आणि जेम्स नशीम यांनी प्रत्येकी 2, तर मिचेल सँटनर, टीम साउदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातच अत्यंत खराब झाली. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (8) आणि ख्रिस वोक्सने हेनरी निकोलसला शून्यावर माघारी पाठवलं. कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलरने चांगल्या भागीदारीचा प्रयत्न केला, पण दोघेही धावबाद झाले. टॉम लाथमने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3, तर ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, लियम प्लंकेट, आदिल रशिद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

न्यूझीलंडचं भविष्य बांगलादेश वि. पाकिस्तान सामन्यावर

न्यूझीलंडची या विश्वचषकातली सुरुवात पाहता सेमीफायनलसाठी दुसऱ्या संघावर अवलंबून रहावं लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पाकिस्तानलाही सेमीफायनलची संधी आहे. कारण, बांगलादेशविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास पाकिस्तान 11 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर येईल. गुणतालिकेतील पहिल्या चार संघांमध्ये सेमीफायनल होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या, भारत दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे.

भारत वि. पाकिस्तान सेमीफायनलची संधी

न्यूझीलंड सध्या 11 गुणांसह चौथ्या, तर भारत 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण 9 गुणांसह पाकिस्तानही पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवल्यास चौथ्या क्रमांकावर येण्याची संधी आहे. तर दुसरीकडे भारतालाही पहिल्या क्रमांकाची संधी आहे. कारण, भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होतोय. 6 तारखेच्या या सामन्यात भारताचा विजय झाल्यास अव्वल स्थान मिळेल. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. कारण, सध्या 14 गुणांसह पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेला हरवल्यास ऑस्ट्रेलिया निर्विवादपणे 16 गुणांसह पहिल्या स्थानी कायम राहिल. नियमानुसार, पहिला वि. चौथा आणि दुसरा वि. तिसरा असा सेमीफायनल सामना रंगणार आहे. सध्या आहे तिच परिस्थिती राहिल्यास भारत वि. इंग्लंड सेमीफायनल होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.