जे झालं ते योग्य नव्हतं, विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज

क्रिकेट विश्वचषक 2019 चा (ICC CWC 2019) विजेता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) विजेतेपद पटकावूनही तितकासा आनंदी नाही.

जे झालं ते योग्य नव्हतं, विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज

लंडन :  क्रिकेट विश्वचषक 2019 चा (ICC CWC 2019) विजेता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) विजेतेपद पटकावूनही तितकासा आनंदी नाही. विश्वचषकाच्या फायनलमध्ये (world cup final) जे झालं, त्यावर मॉर्गनने (Eoin Morgan ) नाराजी व्यक्त केली आहे. फायनलमध्ये यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा (England vs New Zealand ) पराभव करुन जेतेपद पटकावलं. मात्र दोनवेळा हा सामना टाय झाल्याने सर्वाधिक चौकारांच्या निकषावर सामन्याचा निर्णय देण्यात आला.

या विजयानंतर मॉर्गनची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो म्हणाला, “दोन्ही संघाची तुल्यबळ लढत झाली होती. त्यामुळे सामन्याचा निर्णय त्यापद्धतीने (सर्वाधिक चौकार) होणे उचित नव्हतं. सामना बरोबरीचा होता. त्यामुळे मला वाटत नाही की अशा परिस्थितीत कोणत्या तरी एखाद्या प्रसंगावरुन निर्णय देणे योग्य असेल”

यापुढे मॉर्गन म्हणतो, “मी तिथे होतो, त्यामुळे प्रत्यक्षात काय घडलं हे मला माहीत आहे. हा सामना अत्यंत थरारक होता. त्यामुळे कोणत्याही वेळी सामना आपल्या हातात आहे, असं म्हणूच शकत नव्हतो.

विश्वचषकाची फायनल

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही 50 षटकात सर्वबाद 241 धावा केल्याने सामना टाय झाला.

सामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला. त्यानुसार इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.


संबंधित बातम्या 

World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली  

धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’   

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI