ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर

सामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला.

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर

लंडन : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या थरारक फायनलमध्ये दोनवेळा सामना टाय झाला. त्यामुळे इंग्लंडला चौकारांच्या संख्येवरुन विजयी घोषित करण्यात आलं. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ करुनही, न्यूझीलंड कमनशीबी ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही 50 षटकात सर्वबाद 241 धावा केल्याने सामना टाय झाला.

सामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला. त्यानुसार इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

दिग्गजांकडून आयसीसीच्या नियमावर बोट

सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यास सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी हा आयसीसीचा नियम आहे. मात्र याच नियमावर विश्वचषकाच्या फायनलनंतर टीका होत आहे. ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये पेनल्टी शूटआऊटनंतर सडनडेथद्वारे निकाल लावला जातो, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये तसा नियम का नाही असा सवाल विचारला जात आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून, भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या फायनलचा हिरो गौतम गंभीरपर्यंत अनेकांनी आयसीसीच्या नियमावर बोट ठेवलं आहे.

मोहम्मद कैफची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ म्हणतो, “सर्वाधिक चौकारांचा नियम पचवण्यास कठीण जात आहे. सडनडेथसारखा कोणतातरी नियम हवा, ज्यामुळे निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवण्यात याव्या. एक संघ विजेता घोषित करण्याबाबत समजू शकतो, पण सर्वाधिक चौकारांच्या नियमाऐवजी दोघांना विभागून विजेतेपद देणे जास्त योग्य ठरलं असतं”

अभिनेता शाहिद कपूरची प्रतिक्रिया 

अभिनेता शाहिद कपूरनेही विश्वचषकाच्या फायनलबाबत केलेल्या ट्विटला अनेक लाईक्स आणि रिट्विट मिळत आहेत. शाहिद कपूर म्हणतो, “या वर्ल्डकपचं विजेतेपद हे विभागूनच द्यायला हवं. जर इंग्लंडने जास्त चौकार मारले असतील, तर न्यूझीलंडने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे विजयाचा निकष चुकीचा आहे. दोन्ही संघातील 22 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली, कोणीही कमी पडला नाही. मग केवळ 11 खेळाडूंनाच आपणच बेस्ट असल्याचा मान का मिळावा?”

युवराज सिंहची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सिक्सर किंग युवराज सिंहनेही आयसीसीच्या या नियमावर खंत व्यक्त केली आहे. “मी त्या नियमाशी सहमत नाही, पण नियम हे नियम असतात. अखेर विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लंडचं अभिनंदन. न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली, जबरदस्त खेळ आणि जबरदस्त फायनल”, असं युवराज सिंह म्हणाला.

गौतम गंभीर

कोणत्या परिणामांचा हा खेळ आहे हे समजत नाहीय. क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलचा निकाल सर्वाधिक चौकारांवरुन देण्यात आला. हा खूपच हास्यास्पद नियम आहे. तो सामना टायच असायला हवा होता. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोघेही विजेते आहेत, असं गंभीर म्हणाला.

संबंधित बातम्या 

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर   

धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’   

ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?   

ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!   

World Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही 

Published On - 10:51 am, Mon, 15 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI