वडीलांनी गाजवलं मैदान, मुलांना करता आली नाही कमाल, बाप-लेक क्रिकेटरची यादी
क्रिकेटमध्ये अनेक वेळा बाप-लेकाची जोडी पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत हे क्षेत्र गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू क्रिकेटमध्ये त्यांना फारसं यश आलेले नाही.

क्रिकेट असो वा अन्य क्षेत्र वडीलांसारखे मुलांना पराक्रम करता आलेला नाही. अनेक क्रिकेटपटू पुत्रांचे करीयर सुरु होताच संपलेले आहे. यात पिता पूत्रांच्या जोडीत सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे सध्याचे चर्चेतले नाव आहे. क्रिकेटचा गेल्या पिढीचा बादशाल सुनील गावस्ककर आणि रोहन गावस्कर या पिता-पुत्राची जोडीही अशीच…वडीलांनी विक्रमांवर विक्रम केले परंतू मुलांना काही सूर गवसलाच नाही.चला तर असे किती दुर्दैवी बाप-लेक आहेत हे पाहूयात…
सचिन-अर्जुन पितापूत्र
सचिन तेंडुलकर याचा झंझावातासमोर कोणी टीकले नाही. त्याला क्रिकेटचा देव मानले जाते. या दिग्गज खेळाडूने धावांचा पाऊस पाडला.अनेक विक्रमी शतके केली. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. परंतू अर्जुन तेंडुलकर अजूनही टीममध्ये आपली जागा निश्चित करु शकला नाही. आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुनला आपल्या टीममध्ये घेतले होते. परंतू अर्जुन काही खास चमत्कार करु शकला नाही.
हनिफ मोहम्मद-शोएब मोहम्मद
हनिफ मोहम्मदचा नाव टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्यासाठी ओळखले जाते. पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूने वेस्ट इंडिज विरोधात ९७० मिनिटे क्रिजवर उभे राहून ३३७ धावांचा पाऊस पाडला होता. यांचा मुलगा शोएब मोहम्मद क्रिकेटमध्ये मोठं नाव करु शकला नाही. शोएबने ४५ टेस्ट मॅचेसमध्ये ४४.३४ च्या सरासरीने रन केले.
सुनील गावस्कर आणि रोहन गावस्कर
भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडी लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत. ते पहिले भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण केले. त्यांच्यानावे ३४ शतके आहे. तर त्यांचा मुलगा रोहन गावस्कर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ११ सामने खेळले. त्यात १८.८७ च्या सरासरीने १५१ रन केले. रोहन गावस्करचा क्रिकेट करीयर काही फळले नाही.
संजय बांगर-अनाया बांगर
संजय बांगर टीम इंडियासाठी खेळले आहेत. आणि भारतीय टीमचे कोच म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली, त्याचा मुलगा आर्यन हा अंडर १६ क्रिकेट खेळला आहे. परंतू आता आर्यन मुलापासून मुलगी बनला आहे. तो सर्जरीद्वारे मुलगी बनला आहे. अनाया एक ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
