AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuvraj Singh: आईने खूप त्रास सहन केलाय… वडिलांनी थाटला दुसरा संसार… खासगी आयुष्यावर युवराज अखेर व्यक्त झालाच

Yuvraj Singh: युवराज लहान असतानाच वडिलांनी सोडली साथ आणि थाटला अभिनेत्रीसोबत संसार, अनेक वर्षांनंतर युवराज म्हणाला, 'आईने खूप त्रास सहन केलाय...', पत्नीबद्दल देखील युवीने व्यक्त केल्या भावना...

Yuvraj Singh: आईने खूप त्रास सहन केलाय... वडिलांनी थाटला दुसरा संसार... खासगी आयुष्यावर युवराज अखेर व्यक्त झालाच
Former Indian cricketer Yuvraj Singh
| Updated on: Jan 30, 2026 | 9:51 AM
Share

Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण युवराज याचं बालपण फार कठीण होतं. सांगायचं झालं तर, युवराज याने क्रिकेट विश्वात स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, ते फक्त आणि फक्त वडील योगराज सिंह यांच्यामुळे… कारण वडिलांनी युवराज याला क्रिकेट शिवाय दुसरा कोणता खेळ खेळूच दिला नाही. युवराज याचे वडील फार कठोर होते. पण युवीला वडिलांसोबत फार काळ राहता आलं नाही. नुकताच सानिया मिर्झा हिच्यासोबत बोलताना युवराज याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. विशेषतः त्याने आईच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

युवराज सिंह म्हणाला, ‘मी माझ्या आईला खूप त्रास सहन करताना पाहिलं आहे. या विषयी मी फार काही बोलणार नाही, की नक्की काय झालं होतं आणि का झालं होतं… माझी आई तिच्या आई – वडिलांसोबत राहत होती. ज्या दिवशी मला पहिला चेक मिळाला, तो क्षण माझ्यासाठी फार खास होची… मला असं वाटलं, मी त्या महिलासाठी काहीतरी करु शकलो, जिने माझी इतके वर्ष रक्षा केली आहे. आईला काहीतरी देण्याची वेळ आली, तेव्हा मी तिला तिच्या हक्काचं घर दिलं.’

पत्नी हेजलबद्दल देखील युवराज याने मोठं वक्तव्य केलं.

वडील होण्याबद्दल बोलताना युवराजने त्याचे संपूर्ण श्रेय पत्नी, अभिनेत्री हेजल कीचला दिलं. ‘माझ्या मुलांसोबत माझं नातं फार चांगलं आहे आणि याचं श्रेय मी पुर्णपणे हेजल याला देत आहे… मुलांचा जन्म झाल्यानंतर मी त्यांचे डायपर बदलायला आणि दूध पाजायला खूप घाबरायचो. पण तेव्हा मला हेजलने समजावलं, असं केल्यामुळे तुझं मुलांसोबत नातं आणखी घट्ट होईल. आज परिस्थिती अशी आहे की, मी एक महिना तरी मुलांना भेटलो नाही तर, आम्ही रोज बोलत असतो. दूर असलो तर, मला त्यांची खूप आठवण येते आणि त्यांना माझी… ‘

स्वतःचं लहानपण आठवत युवी म्हणाला, ‘कधीकधी असं वाटतं की काही क्षणी आपले आई – वडील आपल्यासोबत नव्हते. मला कायम असं वाटायचं की, मी माझ्या आई – वडिलांसोबत थीम पार्कमध्ये जाऊ शकलो असतो तर… सहलीला जाऊ शकलो असतो तर…. तेव्हा काही कळत नव्हतं… पण आता कळत आहे… असं देखील युवराज म्हणाला.

युवराज सिंह याच्या वडिलांचं दुसरं लग्न

युवराज सिंह याची आई शबनम यांना घटस्फोट दिल्यानंतर, योगराज यांनी 90 च्या दशकातील पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेल यांच्यासोबत लग्न केलं. नीना बुंदेल आणि योगराज यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे… त्यांच्या मुलगा विक्टर अभिनय विश्वात सक्रिय आहे, तर मुलगी अमरजीत कौर रॅकेट प्लेयर आहे… पूर्वी ती टेनीस खेळायची… तिचं निकनेम एमी असं आहे…

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी