IND vs PAK : पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, सूर्यकुमार यादवचे वागणे पाहून शोएब अख्तर रडकुंडीला, थेट रडक्या चेहऱ्याने म्हणाला…
India-Pakistan Cricket Match Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार सामना झाला. विशेष म्हणजे भारताच्या संघाने पाकिस्तानला धुळ चारली. यासोबतच पाकिस्तान संघासोबत साधे शेक हॅंड देखील भारतीय संघाने केले नाही.

नुकताच दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामना झाला असून भारताने या सामन्यात विजय मिळवलाय. मात्र, भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशी लोकांची भावना बघायला मिळाली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. फक्त हल्लाच नाही तर थेट धर्म विचारून लोकांवर गोळ्या झाडल्या. पहलगाम हल्ल्याच्या काही महिन्यांनंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी लोकांची भावना होती. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा एकतर्फी विजय पाकिस्तानविरोधात मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला. हेच नाही तर भारतीय संघाने पाकिस्तान संघासोबत शेक हॅंड देखील केले नाही. सूर्यकुमार यादवने या विजयानंतर स्पष्ट केले की, काही भावना या खेळापेक्षाही मोठ्या असतात.
भारताने घेतलेल्या या शेक हॅंड न करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानला मिरच्या झोंबल्याचे बघायला मिळतंय. माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर याने यावर थेट भाष्य केले. सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताच शोएब अख्तरचा संयम सुटल्याचे बघायला मिळाले. सूर्यकुमारचे बोलणे ऐकून त्याच्या आवाजातील भीती आणि अपमान स्पष्ट दिसला. पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील लाईव्ह शोमध्ये त्याच्या मनातील भावना स्पष्ट दिसल्या.
शोएब अख्तरने पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवर बोलताना म्हटले की, भारत नक्कीच चांगला खेळला. पण हा क्रिकेटचा सामना होता. त्याला तुम्ही राजकीय वळण देऊ नका. आम्ही इथे तुमच्याबद्दल चांगलाच गोष्टी सांगत आहोत आणि बोलत आहोत. तुम्ही सामन्यानंतर अशी विधाने करतात…हस्तांदोलन करा…काही होत नाही…भांडणे, वाद हे होतच राहतात. प्रत्येक घरात होतात. मी खरोखरच सांगतो की, मी जर मैदानात असतो तर आज हस्तांदोलन नक्कीच केले असते.
Shoaib Akhtar crying over the handshake saga 😂 Same guy was chilling with Asim Munir & Afridi months back. Well done Surya – strike as deep as Nur Khan Air Base! 🔥🇮🇳 #INDvsPAK #IndianCricket #IndiaVsPakistan #aisacup2025 #indvspak2025 https://t.co/6O4XkugN8U pic.twitter.com/t9V8pCk0U8
— Gaurav (@k_gauravs) September 15, 2025
हे सर्व बोलताना शोएब अख्यर रडकुंडीला आल्याचे त्याच्या आवाजाहून आणि बोलण्यावरून स्पष्ट दिसत होते. सूर्यकुमार यादवने सांगितले होते की, मला वाटते की ही एक उत्तम संधी आहे आणि आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत आणि आमची एकता व्यक्त करतो, असे त्याने म्हटले होते.
