AFC Asian Cup 2023: भारत आशियातील मातब्बर फुटबॉल टीम्सना भिडणार, ‘हे’ आहेत पात्र ठरलेले संघ

| Updated on: Jun 15, 2022 | 2:51 PM

पुढच्यावर्षी AFC एशियन कप 2023 स्पर्धेत (AFC Asian Cup) कुठले संघ खेळणार ते निश्चित झालं आहे. मंगळवारी पात्रता फेरीचे सामने संपले.

AFC Asian Cup 2023: भारत आशियातील मातब्बर फुटबॉल टीम्सना भिडणार, हे  आहेत पात्र ठरलेले संघ
Indian football team
Image Credit source: AIFF
Follow us on

कौला लुंपुर: पुढच्यावर्षी AFC एशियन कप 2023 स्पर्धेत (AFC Asian Cup) कुठले संघ खेळणार ते निश्चित झालं आहे. मंगळवारी पात्रता फेरीचे सामने संपले. भारतही (India) सलग दुसऱ्यांदा AFC एशियन कप 2023 फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीच्या सहा ग्रुप्समधून 11 संघ एशियन कपसाठी पात्र ठरले आहेत. बिशकेक, कोलकाता, कौला लुंपुर, कुवेत शहर, नामानगान आणि उलानबातार येथे हे पात्रता फेरीच्या लढती आयोजित करण्यात आल्या होत्या. तजाकिस्तानने (Tajakistan) सुद्धा इतिहास रचला असून ते सुद्धा पहिल्यांदा एशियन कपसाठी क्वालिफाय झाले आहेत. जून 2021 मध्ये एशियन कप क्वालिफायर्सचा दुसरा राऊंड झाला होता. त्यावेळी 13 संघ पात्र ठरले होते. आता आणखी 11 संघ या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाले आहेत.

हाँगकॉगवर भारताचा मोठा विजय

9 पॉइंटसह जॉर्डन ग्रुप ए मधला विजेता ठरला. पॅलेस्टाइनचा संघ ग्रुप बी मध्ये टॉपर आहे. त्यांनी तीन विजय मिळवले. ग्रुप सी मधून उझबेकिस्तान विजेता आहे. भारतीय संघ ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताने आपले तिन्ही सामने जिंकले. भारताने आधी अफगाणिस्तान, नंतर कंबोडियाला हरवलं. अंतिन सामन्यात भारताने हाँगकॉगवर 4-0 असा मोठा विजय मिळवला. कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडीयमवर हा सामना झाला. भारतीय फुटबॉल टीम सलग दुसऱ्यांदा एशियन कप स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. याआधी 2019 मध्ये ते पात्र ठरले होते. त्यावेळी भारताचा साखळी फेरीत तीन पैकी दोन सामन्यात पराभव झाला होता. भारतीय संघ यापूर्वी 1964, 1984 आणि 2011 मध्ये एशियन कपसाठी पात्र ठरला होता.

हे देश एशियन कपसाठी ठरले पात्र

ग्रप ए मध्ये इंडोनेशिया, ग्रुप सी मध्ये थायलंड, ग्रुप डी मध्ये हाँगकाँग आणि ग्रुप इ मध्ये मलेशिया उपविजेते ठरले. ते सुद्धा या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन, इराण, इराक, जपान, दक्षिण कोरिया, लेबनॉन, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, संयुक्त अरब अमिराती आणि विएतनाम हे देश आधीच एशियन कप साठी पात्र ठरले आहेत.