‘काळ कठीण पण लढाई नक्की जिंकू’, कोरोनाविरोधी लढ्यात भाऊ-भाऊ मैदानात, हार्दिक-कृणालकडून मदतीची घोषणा

| Updated on: May 25, 2021 | 6:45 AM

भारताचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) या बंधूंची जोडी कोरोना विरोधी लढ्यात मैदानात उतरली आहे. (Hardik pandya krunal Pandya Donate 200 Oxygen Concentrator)

काळ कठीण पण लढाई नक्की जिंकू, कोरोनाविरोधी लढ्यात भाऊ-भाऊ मैदानात, हार्दिक-कृणालकडून मदतीची घोषणा
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या
Follow us on

मुंबई :  भारताचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) या बंधूंची जोडी कोरोना विरोधी लढ्यात मैदानात उतरली आहे. हार्दिक आणि कृणालने  कोरोना विषाणूशी (Corona Virus) लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स (Oxygen Concentrator) देण्याची घोषणा केली आहे. हार्दिक आणि कृणालकडून 200 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. हे कॉन्सेट्रेटर्स येत्या काही दिवसांत वितरित केले जातील. (Hardik pandya krunal Pandya Donate 200 Oxygen Concentrator)

देशात कोरोनाची महाभयंकर दुसऱ्या लाटेने थैमान घातलंय. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होतीय तर हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक दानशूर, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आहेत. अनेक क्रिकेटपटूंनीही कोव्हिडग्रस्तांसाठी मदतीचा हात देऊ केला आहे. यामध्ये हार्दिक आणि कृणालने मोठी भूमिका बजावली आहे.

मदतीची घोषणा करताना कृणाल पांड्याने ट्विट करुन म्हटलंय, “ऑक्सिजन नवी खेप सगळ्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं याअपेक्षेसह कोव्हिड केअर सेंटरवर पाठवत आहोत. सगळ्यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करावी… “, याच ट्विटला रिप्लाय करत हार्दिकने म्हटलं आहे, “आपण ही कठीण लढाई लढतो आहोत आणि सगळे मिळून ही लढाई जिंकू शकतो, सर्वांनी मदतीचं पाऊल उचललं तर लढाई आणखी सोपी होईल…”

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोनाग्रस्तांसाठी (Corona Virus) ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स (Oxygen Concentrator) देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून 10 लीटरचे 2000 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, यामुळे गरजूंना आवश्यक वैद्यकीय मदत मिळेल. तसेच साथीच्या आजारामुळे होणारा त्रासही कमी होईल. भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे बरेच नुकसान झाले आहे. यामुळे वैद्यकीय पुरवठा व ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सिजनअभावी बर्‍याच लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

(Hardik pandya krunal Pandya Donate 200 Oxygen Concentrator)

हे ही वाचा :

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा

WTC Final : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विराट-रोहित नव्हे, तर टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा