भारताला धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या टी 20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बाहेर पडला आहे. पंड्याच्या कमरेला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. BCCI ने गुरुवारी याबाबतची माहिती दिली. हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जाडेजाचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. तर पंड्याऐवजी टी …

भारताला धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या टी 20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बाहेर पडला आहे. पंड्याच्या कमरेला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. BCCI ने गुरुवारी याबाबतची माहिती दिली. हार्दिक पंड्याच्या जागी रवींद्र जाडेजाचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. तर पंड्याऐवजी टी 20 संघात कोणाला संधी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हार्दिक पंड्याच्या कमरेच्या खालच्या भागाला दुखापत झाल्याने, त्याला उपचारासाठी बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने पंड्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पंड्या काही दिवस मेडिकल पथकाच्या देखरेखीखाली असेल.

त्याआधी गेल्या वर्षी पंड्या याच दुखापतीमुळे आशिया चषकातूनही बाहेर पडला होता. पाकिस्तानच्या डावाच्या 18 व्या षटकात पंड्या कमरदुखीमुळे जमिनीवरच कोसळला होता. त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला होता.

पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, केएल राहुल, रिषभ पंत

अखेरच्या तीन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल, रिषभ पंत

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, विजय शंकर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंडेय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

पहिला टी 20: 24 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

दुसरा टी 20: 27 फेब्रुवारी, बंगळुरु

पहिला वनडे: 2 मार्च, हैदराबाद

दुसरा वनडे: 5 मार्च, नागपूर

तिसरा वनडे: 8 मार्च, रांची

चौथा वनडे: 10 मार्च, मोहाली

पाचवा वनडे: 13 मार्च, दिल्ली

संबंधित बातम्या 

विश्वचषकापूर्वी अखेरच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *