विश्वचषकापूर्वी अखेरच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : साडे तीन महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताने संघ निवडण्यासाठी कंबर कसली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळवण्यात येणाऱ्या दोन टी-20 आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केलाय. या मालिकेतूनच विश्वचषकातील निवडीचा मार्ग तयार होणार असल्याचे संकेत निवड समितीने दिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीचं पुन्हा कमबॅक …

विश्वचषकापूर्वी अखेरच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : साडे तीन महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताने संघ निवडण्यासाठी कंबर कसली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळवण्यात येणाऱ्या दोन टी-20 आणि पाच सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केलाय. या मालिकेतूनच विश्वचषकातील निवडीचा मार्ग तयार होणार असल्याचे संकेत निवड समितीने दिले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीचं पुन्हा कमबॅक झालंय. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. याशिवाय मधल्या फळीत रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलाय. त्यामुळे या दोघांपैकीच एक खेळाडू विश्वचषकासाठी निवडला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय.

रिषभ पंतच्या एंट्रीमुळे दिनेश कार्तिकला बाहेर बसवण्यात आलंय. मात्र टी-20 मालिकेसाठी दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. याशिलाय सलामीची मदार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर असेल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीनंतर अंबाती रायुडू, केदार जाधव, रिषभ पंत, महेंद्र सिंह धोनी यांच्या मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका असेल.

निवडकर्त्यांनी पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्यासह युवा गोलंदाज सिद्धार्थ कौललाही संधी दिली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पहिल्यांदाच कौलची निवड झाली आहे. तीन वेगवान गोलंदाजांसह भारत विश्वचषकासाठी मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. तर खलील अहमदला वगळण्यात आलंय.

संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या आणि विजय शंकर यांच्यावर विश्वास दाखवलाय. रवींद्र जाडेजाची विश्वचषकात पुनरागमन करण्याची आशा आता जवळपास मावळली आहे. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर स्पि गोलंदाजीची मदार असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

पहिला टी 20: 24 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

दुसरा टी 20: 27 फेब्रुवारी, बंगळुरु

पहिला वनडे: 2 मार्च, हैदराबाद

दुसरा वनडे: 5 मार्च, नागपूर

तिसरा वनडे: 8 मार्च, रांची

चौथा वनडे: 10 मार्च, मोहाली

पाचवा वनडे: 13 मार्च, दिल्ली

पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, केएल राहुल, रिषभ पंत

अखेरच्या तीन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल, रिषभ पंत

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, विजय शंकर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंडेय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *