आधी आफ्रिदीला क्लीन बोल्ड, मग हात जोडून माफी, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा व्हिडीओ व्हायरल

राऊफने पहिला चेंडू फेकताच आफ्रिदी क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर राऊफने हात जोडून आफ्रिदीची माफी मागितली

आधी आफ्रिदीला क्लीन बोल्ड, मग हात जोडून माफी, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा व्हिडीओ व्हायरल

PSL 2020 Eliminator 2 LQ Vs MS : ‘पाकिस्तान सुपर लीग’च्या (PSL) दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) क्लीन बोल्ड झाला. आफ्रिदीचा त्रिफळा उडवल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू हॅरिस राऊफ (Haris Rauf) याने अक्षरशः त्याची हात जोडून माफी मागितली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Haris Rauf apologies Shahid Afridi after dismissing him in PSL 2020 Eliminator 2 LQ Vs MS)

पाकिस्तान सुपर लीग 2020 च्या अंतिम फेरीसाठी आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दावेदार मिळाले आहेत. कोव्हिड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पीएसएल अचानक थांबवण्यात आलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्लेऑफ सामना आधी खेळवला होता. तर पीएसएलचा दुसरा एलिमिनेटर सामना (PSL 2020 Eliminator 2) ‘लाहौर कलंदर्स’ आणि ‘मुलतान सुलतान्स’ (Lahore Qalandars Vs Multan Sultans) यांच्यात खेळवला गेला.

‘लाहौर कलंदर्स’नी हा सामना 25 धावांनी जिंकून पीएसएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. फायनलमध्ये त्यांची गाठ ‘कराची किंग्स’सोबत पडणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना लाहोरने 183 धावा केल्या. मुलतानसमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य होते. मुलतानने 13 षटकांत 5 गडी गमावत 116 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी त्यांना 38 चेंडूत 67 धावा करायच्या होत्या.

सामना निर्णायक वळणावर असतानाच शाहीद आफ्रिदी फलंदाजीसाठी आला. आफ्रिदी मैदानात उतरताच सामना पलटवू शकेल, असं अनेकांना वाटत होता. राऊफने पहिला चेंडू फेकला आणि आफ्रिदी क्लीन बोल्ड झाला. त्यासोबतच राऊफने हात जोडून आफ्रिदीची माफी मागण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Haris Rauf apologies Shahid Afridi after dismissing him in PSL 2020 Eliminator 2 LQ Vs MS)

मॅचचा हिरो ठरलेल्या डेव्हिड वाईसने 21 चेंडूत 48 धावा फटकावल्या. त्यामध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्याच्या स्फोटक डावामुळे लाहोरला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत मिळाली. गोलंदाजीतही त्याने स्फोटक कामगिरी केली. त्याने चार षटकांत 27 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय हॅरिस राऊफनेही तीन गडी बाद केले. शाहीन शाह आफ्रिदी आणि दिलबर हुसेन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

संबंधित बातम्या :

भारताकडे धुवाँधार बोलर्स, विराट सेनाच विजयी होणार, ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा

हर्षा भोगले यांची IPL 2020 मधील ड्रिम टीम तयार, संघात रोहित-विराटसह पर्पल कॅप विजेत्याला स्थान नाही

(Haris Rauf apologies Shahid Afridi after dismissing him in PSL 2020 Eliminator 2 LQ Vs MS)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI