AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754 धावांनी पराभव

या सामन्यात अंधेरीची चिल्ड्रन वेलफेअर शाळा पराभूत झाली, पण अनोखी बाब म्हणजे या संघातील सर्वच्या सर्व खेळाडू हे शून्यावर बाद झाले.

क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र सामना, अख्खा संघ शून्यावर बाद, तब्बल 754 धावांनी पराभव
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 21, 2019 | 12:33 PM
Share

मुंबई : मुंबईची प्रतिष्ठित शालेय स्पर्धा हॅरिस शिल्डच्या पहिल्या बाद फेरीच्या सामन्यात एक अनोखी घटना घडली. या सामन्यात अंधेरीची चिल्ड्रन वेल्फेअर शाळा पराभूत झाली, पण अनोखी बाब म्हणजे या संघातील सर्वच्या सर्व खेळाडू हे शून्यावर बाद झाले (Harris shield tournament), कुणीही खातं उघडू शकलं नाही. इतकंच नाही, तर हा संपूर्ण संघ अवघ्या सहा षटकांमध्ये ऑल आऊट झाला (School Team All Out On Zero).

चिल्ड्रन वेल्फेअर संघाच्या खात्यात सात धावा आहेत, मात्र या धावा संघातील कुठल्याही फलंदाजाने काढलेल्या नाही, तर विरोधी संघातील गोलंदाजांच्या चुकांमुळे चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त सात धावा मिळाल्या. जर चिल्ड्रन वेल्फेअरला अतिरिक्त धावा मिळाल्या नसत्या, तर हा संपूर्ण संघ शून्यावर ऑल आऊट झाला असता.

चिल्ड्रन वेल्फेअर शाळेविरोधात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळा होती. या संघाकडून मीडियम पेसर आलोक पालने तीन षटकांत तीन धावा देत सहा विकेट्स घेतल्या (School Team All Out On Zero). तर कर्णधार वरोद वाजेने तीन धावा देत दोन विकेट्स घेतल्या, इतर दोन फलंदाज रन आऊट झाले.

या सामन्यात खेळाच्या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर चिल्ड्रन वेल्फेअरला तब्बल 754 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या परंपरागत आंतरशालेय स्पर्धेत कदाचितच कुणी इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झालं असेल.

आझाद मैदानावरील न्यू एरा मैदानावर आधी फलंदाजी करत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेकडून मीत मयेकरने तिहेरी शतक ठोकलं (338 नाबाद धावा, 134 चेंडू, 56 चौकार आणि 7 षटकार). स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेने 39 षटकांमध्ये 761 धावा केल्या. चिल्ड्रन वेल्फेअरच्या गोलंदाजांनी निश्चित तीन तासांत 45 षटक पूर्ण न केल्याने त्यांच्यावर 156 धावांचा दंड ठोठावण्यात आला. चिल्ड्रन वेल्फेअरने सहा षटक कमी टाकले.

इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकल्यामुळे विवेकानंद शाळेचे प्रशिक्षक महेश लोटीकर हे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय संघाचा ‘हिट-मॅन’ रोहत शर्मा हा देखील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचा माजी विद्यार्थी आहे.

Follow Us
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...