भारत-पाकिस्तान सामना होणार? PCB ने ICC समोर अट घातली? मोठी माहिती समोर

IND vs PAK World Cup 2026: अवघ्या जगाचं लक्ष फक्त आणि फक्त भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, या प्रश्नाकडे लागलं आहे. आता एक मोठी माहिती पाकिस्तानच्या गोटातून समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

भारत-पाकिस्तान सामना होणार? PCB ने ICC समोर अट घातली? मोठी माहिती समोर
PCB
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 1:03 PM

IND vs PAK World Cup 2026: अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागून असलेल्या T-20 वर्ल्डकप 2026 ची सुरुवात आजपासून होत आहे. मात्र, भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. तुम्हाला माहिती आहे की, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ग्रुप सामन्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूर्यानं आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि म्हणाला की, ‘आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही. आमची फ्लाइट आधीच बुक आहे.’ दरम्यान, याचसंदर्भात एक मोठी माहिती पाकिस्तानच्या गोटातून समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

ICC ची PCB सोबत चर्चा सुरू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (PCB) भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-प्रोफाइल सामना करण्यासाठी चर्चा करीत आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे खेळला जाणार आहे.

पाकिस्तानचा भारताविरुद्ध खेळण्यास का नकार?

बांगलादेशला स्पर्धेतून वगळल्यानंतर अलीकडेच पाकिस्तानने भारताविरुद्धच्या ग्रुप ए सामन्यात मैदानात उतरणार नसल्याचे जाहीर केले. तथापि, अद्याप याबाबत काहीही अधिकृत घडलेले नाही. पीसीबीने आयसीसीला मेल केलेला नाही.

PCB ने ICC समोर अटी ठेवल्या?

द टेलिग्राफ ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, PCB ने ICC सोबत सुरू असलेल्या बॅकचॅनेल चर्चेदरम्यान काही अटी ठेवल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना वेळापत्रकानुसार खेळता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अडथळा अजूनही कायम आहे, परंतु रिपोर्टनुसार गेल्या 48 तासांत सकारात्मक निकालाची आशा वाढली आहे. मात्र, पाकिस्तानने ही अट का घातली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणालेत?

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अलीकडेच पुष्टी केली की बांगलादेशशी एकता दर्शविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिल्यानंतर ICC ने सुरक्षेचे आश्वासन दिले असताना सुरक्षेचे कारण देऊन बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. PCB ने बांगलादेशच्या भूमिकेचे जाहीरपणे समर्थन केले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ याचसंदर्भात कॅबेनिटमधील सहकाऱ्यांना म्हणाले की, “टी-20 विश्वचषकाबाबत आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे की, ‘आम्ही भारताविरुद्ध सामने खेळणार नाही कारण खेळाच्या मैदानावर कोणतेही राजकारण होऊ नये. आम्ही हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे आणि आपण बांगलादेशच्या बाजूने पूर्णपणे उभे राहिले पाहिजे. मला वाटते की हा एक अतिशय योग्य निर्णय आहे.”

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने काय मागणी केली?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) ICC ने विश्वचषकातील सामने भारतातून श्रीलंकेत हलवावे, अशी मागणी केली होती. BCB ने म्हटले आहे की, त्यांना देशातील खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आहे. IPL फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने BCCI च्या सूचनेनुसार आगामी हंगामापूर्वी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमानला संघातून रीलिज केले होते, यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.