AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या भारताचा पहिला सामना चीनशी झाला. या सामन्यात दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ झाला. अखेर हा सामना 2-2 ने बरोबरी सुटला.

Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला
Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत,  भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटलाImage Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 6:49 PM
Share

वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गोल झाले आणि सामना 2-2 ने बरोबरीत सुटला. या सामन्यात पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने सामन्यात उत्कृष्ट मैदानी गोल करत आठव्या मिनिटाला भारताला 1-0 ने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. भारतीय खेळाडूने सर्कलच्या आत चिनी खेळाडूला पुश दिल्याने पंचांनी चीनच्या बाजूने निकाल दिला. भारताने यावर तात्काळ रिव्ह्यू घेतला. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. चीनच्या झांग यिंगने पेनल्टी स्ट्रोकवर अप्रतिम फटका मारला आणि गोल केला. त्यामुळे 1-1 अशी बरोबरी झाली. त्यामुळे भारतीय संघावर दडपण वाढलं.

दुसऱ्या क्वॉर्टरच्या 25व्या मिनिटाला भारताकडून दुसरा गोल दीपिकाने केला. दीपिकाचा जोरदार ड्रॅग-फ्लिक एका चिनी बचावपटूच्या खांद्याला लागून दिशा बदलून गोलरक्षकाच्या डोक्यावरून नेटमध्ये गेला. दीपिकाने निर्णायक क्षणी पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्याने भारताला पुन्हा आघाडी मिळाली. मध्यंतरापर्यंत भारताने 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चीनने आक्रमक खेळ दाखवला. तिसऱ्या क्वॉर्टरलच्या सुरुवातीलाच चीनने आक्रमक भूमिका घेत दोन शॉट्स गोलपोस्टच्या दिशेने मारले आणि भारतावर दबाव आणला. त्याचा परिणाम 39व्या मिनिटाला दिसून आला. मा निंगने चीनचा पहिला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून भारताविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर कोणत्याही संघाला आघाडी घेता आली नाही. भारतीय संघाचा पुढील सामना 18 ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघ

  • कर्णधार: सलीमा टेटे
  • गोलरक्षक: सविता पुनिया, बिचू देवी खारीबाम.
  • बचावपटू: इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथांतलुआंगी, ज्योती, शिल्पी डबास.
  • मिडफिल्डर : निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, सलीमा टेटे, नेहा, दीपिका सोरेंग.
  • फॉरवर्ड : लालरेमसियामी, ऋतुजा दादासो पिसाळ, नवनीत कौर, दीपिका सेहरावत, इशिका, बलजीत कौर, ब्यूटी डुंगडुंग

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट