VIDEO : नो बॉल एक फूट पुढे, वाईड एक मीटर बाहेर, खळबळ उडवणारा गोलंदाज कोण?

गोलंदाज क्रिश्मार संतोकीने (Krishmar Santokie bowling video viral BPL) अशा प्रकारे गोलंदाजी केली की त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

VIDEO : नो बॉल एक फूट पुढे, वाईड एक मीटर बाहेर, खळबळ उडवणारा गोलंदाज कोण?
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Dec 14, 2019 | 12:01 AM

ढाका (बांगलादेश) : टी-20 मालिका म्हणजेच बांगलादेश प्रीमिअर लीग (BPL) सुरुवातीपासून वादात सापडली आहे. बुधवारी (11 डिसेंबर) सामना सुरु असताना वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज क्रिश्मार संतोकीने (Krishmar Santokie bowling video viral BPL) वेगळ्याच स्टाईलने गोलंदाजी केली. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. त्यांच्या गोलंदाजीच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (Krishmar Santokie bowling video viral BPL) झाल्या आहेत.

डावखुरा गोलंदाज संतोकीने डावखुऱ्या फलंदाजाच्या लेग साईडला फुलटॉस चेंडू टाकला. हे पाहून उपस्थित सर्वांना धक्का बसला. तो चेंडू जवळपास एक मीटर बाहेर होता. फलंदाजाच्या लेग साईडला एक मीटरपेक्षाही वाईड चेंडू टाकल्याने प्रेक्षकही चकीत झाले होते.

क्रिश्मार संतोकीने दुसऱ्या डावात चटगाव चॅलेंजर्सकडून खेळत असलेल्या श्रीलंकन खेळाडू अविष्का फर्नांडोला वाईड चेंडू टाकला. याच दरम्यान दोन चेंडूंनंतर असा चेंडू फेकला, की तो नो-बॉल म्हणून घोषित करण्यात आला. ज्यामध्ये गोलंदाजाचा दुसरा पाय क्रीजच्या जवळ एक फूट आतमध्ये होता.

या सर्व प्रकारानंतर युजर्संनी सोशल मीडियावर गोलंदाजावर निशाणा साधला. एका युजर्सने ट्वीट करत म्हटले, “ही टी-20 टुर्नामेंट तर सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगसाठी सुरु आहे. तर एका युजर्सने म्हटले, डाल मे कुछ काला है. सध्या मोठ्या प्रमाणात युजर्स या खेळाडूवर टीका करत आहेत.

Follow Us