AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ महिलाच नव्हे, पुरूषांनीही घ्यायलाच हवी त्वचेची काळजी! स्किन केअर रूटीनमध्ये करा ‘या’ गोष्टी

त्वचेची काळजी घेणे फक्त महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. धूळ, प्रदूषण, ऊन आणि शेव्हिंगमुळे पुरुषांच्या त्वचेवरही परिणाम होतो. त्यामुळे रोजच्या रूटीनमध्ये काही सोप्या स्किन केअर सवयींचा समावेश करणे गरजेचे आहे.

केवळ महिलाच नव्हे, पुरूषांनीही घ्यायलाच हवी त्वचेची काळजी! स्किन केअर रूटीनमध्ये करा ‘या’ गोष्टी
| Edited By: | Updated on: Oct 06, 2026 | 3:11 PM
Share

फिटनेस आणि लूककडे लक्ष देताना पुरुषांनी त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ महिलांसाठीच स्किन केअर आवश्यक असते, हा समज आता मागे पडला आहे. पुरुषांच्या त्वचेवरही रोजच्या धावपळीचा परिणाम होत असतो. धूळ, प्रदूषण, उन्हाचा सतत होणारा संपर्क, शेव्हिंग आणि प्रवासामुळे त्वचा कोरडी, निस्तेज किंवा ऑइली होऊ शकते. अशावेळी महागडी स्किन केअर उत्पादने वापरण्यापेक्षा आपल्या त्वचेचा प्रकार समजून घेऊन योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. पुरुषांनी रोजच्या व्यस्त दिनचर्येत त्वचेसाठी थोडा वेळ दिला, तर अनेक सामान्य समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. पुरुषांनी स्किन केअर करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ते जाणून घेऊया.

चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा

स्किन केअरची सुरुवात नेहमी क्लीनिंगपासून होते. सकाळी चेहरा धुण्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्वचा ऑयली, ड्राय किंवा कॉम्बिनेशन प्रकारची आहे, त्यानुसार फेस वॉश किंवा क्लींजर निवडावे. यामुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते. आठवड्यातून किंवा साधारण १० दिवसांतून एकदा जेंटल स्क्रबचा वापर करता येतो.

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे ही देखील महत्त्वाची पायरी आहे. त्वचा तेलकट असली तरी मॉइश्चरायझर पूर्णपणे टाळू नये. त्याऐवजी हलका मॉइश्चरायझर निवडता येतो. फक्त चेहऱ्याचीच नव्हे, तर हात-पायांच्या त्वचेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ओठांसाठी लिप बामचा वापर केल्यास त्यातील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

घराबाहेर पडताना सनस्क्रीन विसरू नका

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे पुरुषांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मॉइश्चरायझरनंतर SPF 30 किंवा SPF 50 असलेले सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. जास्त वेळ उन्हात राहावे लागणार असल्यास काही तासांच्या अंतराने सनस्क्रीन पुन्हा लावणे उपयुक्त ठरू शकते.

नाइट स्किन केअर रूटीनही महत्त्वाची

दिवसभरानंतर रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची स्वच्छता करणे आवश्यक आहे. क्लींजिंगनंतर टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करता येते. चेहऱ्यावर डाग, पिग्मेंटेशन किंवा डोळ्यांच्या आसपास बारीक रेषा जाणवत असतील, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य सीरम, हायड्रेटिंग क्रीम किंवा मास्कचा वापर करता येतो.

दाढी-मिशांची स्वच्छताही महत्त्वाची दाढी आणि मिशांच्या भागाकडे अनेक पुरुष दुर्लक्ष करतात. मात्र या भागाची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. दाढी-मिशा नियमित ट्रिम करण्यासोबत फेस वॉश करताना या भागाचीही नीट स्वच्छता करावी. त्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यास दाढी खालील त्वचा कोरडी पडण्यापासून वाचण्यास मदत होऊ शकते.

Follow Us
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं