AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यानं विचारलं तुला AIDS आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा

Gayathri Suresh : अभिनेत्री गायत्री सुरेशने बिग बॉस ८ मल्याळममध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक दुःखद प्रसंग सांगितला. अभिनेत्रीनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

त्यानं विचारलं तुला AIDS आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा
| Updated on: Oct 06, 2026 | 3:13 PM
Share

मल्याळम चित्रपट अभिनेत्री गायत्री सुरेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ३४ वर्षीय गायत्री सध्या ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांच्या ‘बिग बॉस ८ मल्याळम’मुळे चर्चेत आहे. शनिवारी प्रसारित झालेल्या भागात गायत्री सुरेश शोमधून बाहेर पडली असली तरी, शो सोडण्यापूर्वीच तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. २०१५ मध्ये ‘जम्ना प्यारी’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या गायत्रीनं तिच्या आयुष्यातील संघर्ष सांगितला.

‘बिग बॉस ८ मल्याळम’मध्ये गायत्री सुरेश दुसऱ्यांदा सहभागी झालेली. गायत्रीनं एका टास्कदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. ‘२०२१ मध्ये मी एका वादात अडकले होते. त्यावेळी मी रिलेशनशिप होते.’ असं अभिनेत्री म्हणाली.

गायत्री सुरेश शोमधून बाहेर पडण्यापूर्वी, एका टास्कदरम्यान, बिग बॉसनं तिला विचारलं, ‘जर तुला तुझ्या आयुष्यातील अशा व्यक्तीशी बोलायची संधी मिळाली, ज्यानं तुला सर्वात जास्त दुखावलं आहे, तर तू काय म्हणशील?’ यावर गायत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात अनेक लोकांनी मला दुखावलं आहे, पण ज्या गोष्टीनं मला सर्वात जास्त दुखावलं, किंवा त्यापेक्षा, ज्या गोष्टीनं मला सर्वात जास्त धक्का बसला, ती गोष्ट २०२१ मध्ये घडली, जेव्हा मी एका वादात अडकले होते. त्यावेळी मी रिलेशनशिपमध्ये होते. आमच्या रिलेशनशिपच्या पहिल्याच आठवड्यात त्यानं मला विचारलं की, मला एड्स आहे का? त्याच क्षणी मी त्याच्याशी बोलणं बंद केलं.’

‘मला एखाद्याकडून धोका असेल, हे लगेच समजतं. तरीही, मी लोकांना तीन संधी देते. त्यानंतर ते माझ्या आयुष्यातून निघून जातात. आमच्या रिलेशनशिपच्या पहिल्या आठवड्यात त्यानं मला विचारलं की, मला एड्स आहे का? त्याच क्षणी मी त्याच्याशी बोलणं थांबवले. पण नंतर मला समजलं की, तो दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होता.’

गायत्री सुरेशचा अपघात

गायत्री सुरेशनं कार अपघाताबद्दलही सांगितले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी त्यावेळी खूप वाईट परिस्थितीतून जात होते. हो, माझ्यातही अनेक वाईट सवयी आहेत, त्यामुळे मी स्वतःला एक परिपूर्ण व्यक्ती म्हणणार नाही. पण माझं मन स्वच्छ आहे आणि मला कोणालाही दुखवायचं नाही. मग त्यानं मला पूर्णपणे दुर्लक्षित करायला सुरुवात केली. एके दिवशी मी हट्ट धरला आणि त्याला सांगितलं की मला त्याला भेटायचं आहे, म्हणून तो आला. आम्ही गाडीत एकत्र होतो तेव्हा तो अपघात घडला.’ ही घटना ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली. गायत्री सुरेश एका मित्रासोबत गाडीतून प्रवास करत होती. घटनेच्या वेळी अभिनेत्रीचा मित्र गाडी चालवत होता आणि गाडी दुसऱ्या वाहनाला धडकली. या घटनेचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले.

गायत्री पुढे म्हणाली की, ‘पोलीस आले आणि माझ्या बॉयफ्रेंडला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तो परत आल्यानंतर, त्यानं मला एका कॅफेमध्ये एकटीला सोडलं आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला. हा माझ्यासाठी सर्वात क्लेशदायक अनुभव होता. म्हणून, जर मी त्याला पुन्हा भेटले, तर मी म्हणेन, ‘खूप खूप धन्यवाद.”

Follow Us
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं