T20 World Cup: पुढच्या विश्वचषकात युवा खेळाडूंना संधी द्यावी, विरेंद्र सेहवागचं खळबळजनक वक्तव्य
न्यूझिलंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका करण्यात येत आहे.

मुंबई : आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा ऑस्ट्रे्लिया आणि आफ्रिका यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी दिली होती. त्यावेळी सुद्धा टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) संपातला होता. टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी सुद्धा त्यावेळी निवड समितीवर टीका केली होती. विशेष म्हणजे नंतर त्याच खेळाडूंना पुन्हा विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) संधी देण्यात आली. त्यावेळी सुद्धा रवी शास्त्री, कपिल देव, सुनील गावस्कर आणि सेहवाग या टीम इंडियाच्या खेळाडूंनी निवड समितीला अनेक प्रश्न केले होते.
न्यूझिलंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे ज्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंवर जोरदार टीका झाली आहे.
विरेंद्र सेहवागने टीम इंडियाला नेहमी चुकीच्यावेळी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ले दिले आहेत. तसेच तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. विश्वचषक स्पर्धेत सोशल मीडियावर सेहवागच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
टीम इंडियात नव्या खेळाडूंना संधी द्यायला हवी असं वक्तव्य सेहवागने केलं आहे. अद्याप विरेंद्र सेहवागने कोणत्याही वरिष्ठ खेळाडूचं नाव घेतलेलं नाही.
क्रिकबजशी बोलनाता सेहवाग म्हणाला की, ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी टीम इंडियामध्ये कोणताही अनुभवी खेळाडू नव्हता. सगळे युवा खेळाडू टीममध्ये होते. त्यामुळे पुढच्या विश्वचषकाच्यावेळी टीम इंडियामध्ये सिनिअर खेळाडूंची गरज नाही.
