Test Cricket : खरचं ‘कसोटी क्रिकेट धोक्यात आहे? काय भविष्यात सामन्यांची संख्याही कमी होणार?’, आयसीसी अध्यक्षांनी असं काय बोबले ज्यामुळे चिंता वाढली

विशेषत: भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड सारख्या संघांविरुद्ध खेळण्याची फारशी संधी मिळत नाही अशा देशांच्या कमाईच्या दृष्टीकोनातून. पुढील 10-15 वर्षांत कसोटी क्रिकेट हा खेळाचा अविभाज्य भाग राहील पण सामन्यांची संख्या कमी होऊ शकते.

Test Cricket : खरचं 'कसोटी क्रिकेट धोक्यात आहे? काय भविष्यात सामन्यांची संख्याही कमी होणार?', आयसीसी अध्यक्षांनी असं काय बोबले ज्यामुळे चिंता वाढली
कसोटी क्रिकेट
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 04, 2022 | 1:50 PM

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15वा हंगाम नुकताच संपला आहे. संपूर्ण क्रिकेट जग या लीगची वाट पाहतात कारण जगभरातील दिग्गज खेळाडू यात खेळतात. आयपीएलच्या धर्तीवर जवळपास प्रत्येक क्रिकेट बोर्डाने फ्रँचायशी आधारित टी-20 लीग सुरू केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (BBL), पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीग (PSL), बांगलादेश प्रीमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग यांसारख्या लीगही सुरू झाल्या आहेत. पुढील वर्षापासून UAE T20 लीग देखील सुरू होणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका देखील स्वतःची T20 लीग सुरू करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण वाढत्या T20 लीगमुळे ICCचेअरमन ग्रेग बार्कले यांना चिंता वाढली आहे. बार्कलेने चेतावणी दिली आहे की देशांतर्गत टी20 लीगच्या वाढत्या हंगामामुळे कसोटी क्रिकेट मालिका लहान होत आहेत. तर पुढील दशकात कसोटी सामन्यांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये, ICC चेअरमन बार्कले यांनी सांगितले की पुढील वर्षी सुरू होणार्‍या पुढील सामान्यांचे आणि दौर्‍यांचे वेळापत्रक ठरवताना ICCला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार. हे वकतव्य त्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान केलं होतं. त्यावेळी बीबीसीकडून कसोटी सामन्यात विशेष कार्यक्रमात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होती की, दरवर्षी महिला आणि पुरुष क्रिकेटची एक स्पर्धा असते.” याशिवाय देशांतर्गत लीग वाढत आहे. त्यामुळे द्विपक्षीय मालिका लहान होत आहेत.

देशांचा महसूल कमी होईल

अशा परिस्थितीत अनेक देशांच्या महसुलावर परिणाम होत असल्याचेही बार्कले यांनी म्हटले आहे. तसेच “याचे दुर्दैवी परिणाम होतील,” असेही ते म्हणाले. तसेच खेळण्याच्या अनुभवाच्या दृष्टीकोनातून आणि ज्या देशांना विशेषत: भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड सारख्या संघांविरुद्ध खेळण्याची फारशी संधी मिळत नाही अशा देशांच्या कमाईच्या दृष्टीकोनातून. पुढील 10-15 वर्षांत कसोटी क्रिकेट हा खेळाचा अविभाज्य भाग राहील पण सामन्यांची संख्या कमी होऊ शकते.

बिग थ्री प्रभावित होतील

भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सूचित केले. महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप तितक्या वेगाने विकसित होत नसल्याचेही बार्कले यांनी सांगितले. ते म्हणाले, कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी देशांतर्गत रचना अशी असावी जी कोणत्याही देशात नाही. महिला क्रिकेटमध्ये कसोटीचे स्वरूप इतक्या वेगाने विकसित होत आहे, असे मला वाटत नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें