AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs NZ : भारत हारणार की जिंकणार न्यूझीलंड? सामन्यापूर्वीच जादूगार पोपटाची धक्कादायक भविष्यवाणी, कोण बाजी मारणार क्रमवारीत

ICC Champions 2025 India Vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्ध भारताला सुरुवातीलाच दोन मोठे धक्क बसले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहे. तर या जादूगार पोपटाने कोणता देश हा सामना जिंकणार यांची धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.

IND Vs NZ : भारत हारणार की जिंकणार न्यूझीलंड? सामन्यापूर्वीच जादूगार पोपटाची धक्कादायक भविष्यवाणी, कोण बाजी मारणार क्रमवारीत
कोणता संघ बाजी मारणार?Image Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2025 | 3:17 PM
Share

गट अ मध्ये भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. शुभमन गिलनंतर रोहित शर्मा तंबूत परतला. त्यामुळे भारतीय चाहते टेन्शनमध्ये सापडले आहे. त्यातच समाज माध्यामावर या जादूगार पोपटाच्या भविष्यवाणीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर प्रीडिक्शन स्टार नावाच्या खात्यावर एका पोपटाने या सामन्याची भविष्यवाणी केली आहे. यापूर्वी या पोपटाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. त्यानंतर भारत -न्यूझीलंड सामन्यापूर्वीच त्याने कोणता संघ जिंकणार याचे भाकीत केले आहे.

कोणता संघ जिंकणार?

बांगलादेश आणि पाकिस्तान विरोधातील सामन्यात कोणता संघ जिंकणार याची भविष्यवाणी या पोपटाने केली होती. त्यावेळी सर्वांनी त्याची खिल्ली उडवली होती. पण बांगलादेशाने पारडे बदलवले आणि पोपटाचे भाकीत खरे ठरले. त्यानंतर अनेक जणांनी भारत-न्यूझीलंड सामन्यात काय होईल, याचा अंदाज व्यक्त केला. पण सगळ्यांचे लक्ष या जादूगार पोपटाकडे लागले आहे.

या व्हिडिओनुसार, पोपटाचा मालक, पिंजरा उघडतो आणि पोपट समोर असलेल्या चिठ्ठ्यांच्या गड्डीतून एक कार्ड उचलतो. त्यातील एक आवडती चिठ्ठी निवडल्याचे तो खुणावतो. त्यानंतर हे कार्ड तो मालक कॅमेऱ्यासमोर दाखवतो. या कार्डवर जिंकलेल्या देशाचा झेंडा असतो. भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यात सुद्धा हा पोपट अशीच कृती करतो. या कार्डवर भारताचा झेंडा दिसतो. म्हणजे या जादूगार पोपटाने भारताच्या विजयाचे भाकीत केले आहे.

भारताने यापूर्वीचे सामने दुबईतच खेळले आहे. हा भारताचा तिसरा सामना आहे. हा सामना सुद्धा दुबईतच सुरू आहे. न्यूझीलंड संघाने यापूर्वीचे दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये खेळले आहेत. भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत एक ही सामना हारलेला नाही. दोन्ही सामने त्यांनी खिशात घातले आहे. हे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, क्रमवारीत अव्वलस्थानी असेल.

यापूर्वी IIT वाल्या बाबांनी केलेली भविष्यवाणी त्यांच्या अंगलट आली होती. या बाबाने भारत-पाकिस्तान सामन्यात भारत हरणार असल्याचे भाकीत केले होते. पण बाबा तोंडघशी पडले. भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यानंतर अभयसिंह चांगलेच ट्रोल झाले होते.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.