AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : केवळ अशक्य…विराट कोहली रचणार मोठा इतिहास, कोण तोडणार हा महारेकॉर्ड, न्यूझीलंडच्या सामन्यात होणार कमाल

ICC Champions Trophy 2025 : विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अखेरच्या सामन्यात विराट उतरातच आणखी एक विक्रम त्याच्या खात्यावर जमा होईल. हा विक्रम मोडणे अशक्य असेल. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज सामना होत आहे.

Virat Kohli :  केवळ अशक्य...विराट कोहली रचणार मोठा इतिहास, कोण तोडणार हा महारेकॉर्ड, न्यूझीलंडच्या सामन्यात होणार कमाल
विराट कोहलीचा महाविक्रमImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 02, 2025 | 2:12 PM
Share

भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली नवीन इतिहास रचणार आहे. तो एक मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवणार आहे. विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अखेरच्या सामन्यात विराट उतरातच त्याच्या नावावर महा विक्रम नोंदवला जाईल. हा रेकॉर्ड मोडणे अशक्यप्राय असेल. आता थोड्याच वेळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघ उपांत्यपूर्व सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. हा सामना केवळ औपचारिकता म्हणून ते खेळतील. आज सामना जिंकणारा संघ हा क्रमवारीत सर्वात पुढे असेल.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील गट अ मध्ये भारत आणि न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीसाठी जागा तयार केली आहे. तर दुसऱ्या तंबूत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी गट ब मध्ये जागा निश्चित केली आहे. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ एकही सामना हरलेले नाहीत. आजच्या सामन्यात आता कोण बाजी मारणार हे समोर येईल. जो संघ सामना जिंकेल तो क्रमवारीत अग्रेसर असेल.

कोहलीचा जागतिक विक्रम

ऑलराऊंडर विराट कोहली हा आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवण्यास सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरोधात तो मैदानात उतरताच तो 300 वनडे, 100 टेस्ट आणि 100 टी20 सामना खेळणारा पहिला खेळाडू होईल. विराट कोहली याने आतापर्यंत 299 वनडे, 123 कसोटी आणि 125 टी20 सामने खेळला आहे. 2008 मध्ये श्रीलंकेविरोधात वनडे सामन्यातून त्याची कारकीर्द सुरू झाली होती. 2010 मध्ये त्याने टीम इंडियात त्याची जागा पक्की केली होती. तेव्हापासून त्याची कारकीर्द बहरत गेली.

विराट याने 2012 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याने 2013 मध्ये वनडेचे कर्णधार पद सांभाळले. तो टी20 चा पण कर्णधार झाला. विराटने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. 2011/12 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात अखेरच्या दोन कसोटी सामन्यात तो खेळला होता. त्यानंतर टीम इंडियात त्याचे स्थान पक्के झाले. 68 सामन्यांपैकी 40 मध्ये त्याने विजयासह त्याने नशीब आजमावले. सर्वात वेगवान 10000 वनडे धाव करण्याचा मान सुद्धा त्याला मिळाला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.