VIDEO : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांचा मैदानाबाहेर तुफान राडा

विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या सामन्यादरम्यान दोन्ही देशाच्या चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर बलुचिस्तानवरुन चांगलाच राडा झाला आहे. चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे एकच गोंधळ उडाला.

VIDEO : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांचा मैदानाबाहेर तुफान राडा

इंग्लंड (Pakistan vs Afghanistan) :  विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान हा सामना लंडनच्या हेडिंग्ले या मैदानावर आज खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यादरम्यान दोन्ही देशाच्या चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर बलुचिस्तानवरुन राडा झाला. चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे एकच गोंधळ उडाला.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बलुचिस्तानवरुन वाद सुरु आहे. त्याच मुद्द्यावरुन या दोन्ही संघाचे चाहते एकमेकांना भिडले. मैदानाबाहेर झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान याबाबत व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही संघातील सामना सुरु असताना ‘बलुचिस्तानसाठी न्याय द्या’ अशी घोषणा करणारे एक मैदानावरुन गेले. त्या विमानातून अशाप्रकारचा संदेशही आकाशात लिहिण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच मैदानाबाहेर अफगाण व पाकिस्तान चाहते भडकले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर सुरक्षारक्षकांनी दोन्ही देशातील चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले. तसेच काही चाहत्यांनी सुरक्षा रक्षकांनी मैदानाबाहेरही काढले.

दरम्यान मैदानावरून उडत असलेले विमान हे अनधिकृतपणे तेथे गेले असून सध्या लीड्सचा एअऱ ट्राफिक विभाग त्या विमान प्रकरणाचा तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *