World Cup : धवनची 'गब्बर'गिरी, सचिनशी बरोबरी, भारताचे अनेक विक्रम

इंग्लंडच्या मैदानात वनडे सामन्यात चार शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.  

World Cup : धवनची 'गब्बर'गिरी, सचिनशी बरोबरी, भारताचे अनेक विक्रम

INDvsAUS  लंडन : सलामीवीर शिखर धवनची शतकी खेळी आणि गोलंदाजाच्या दमदार कामगिरीमुळे भारताने विश्वचषकातील दुसरा विजय मिळवला. लंडनच्या ओव्हल मैदानात काल (9 जून)  खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. धवनच्या 117, कर्णधार विराट कोहलीच्या 82 आणि रोहित शर्माच्या 57 धावांच्या जोरावर, भारताने कांगारुंसमोर 353 धावांचं तगडं आव्हान उभं केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीमचा पार धुव्वा उडाला. कांगारुंना भारताने 50 षटकात 316 धावांत गुंडाळलं.

या सामन्यात धवनने 109 चेंडूमध्ये 117 धावा केल्या. शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे भारतीय टीमच्या नावे अनेक रेकॉर्डची नोंद झाली आहे.

धवनचे 17 वे शतक

वनडे क्रिकेट सामान्यात शिखर धवनच्या नावे 17 व्या शतकाची नोंद झाली आहे. तर ओव्हल मैदानात शिखरने आपले तिसरे शतक झळकावले. धवनने आतापर्यंत या मैदानात 5 सामान्यात 3 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत.

मास्टर ब्लास्टरशी बरोबरी  

विशेष म्हणजे धवनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली. सचिनने आतापर्यंत आयसीसी सामन्यात 6 शतकी खेळी केल्या आहेत. मात्र कालच्या सामान्यात शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे त्याच्या नावेही 6 शतकांची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध काल धवनने चौथा सामना खेळला. परदेशात धवनचे हे 12 वे शतक ठरले असून इंग्लंडमध्ये त्याने चार वेळा शतक ठोकले आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या धवनने 16 चौकारांच्या मदतीने 117 धावा ठोकल्या. त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिली. विराट कोहलीने 77 चेंडूत 82 धावा केल्या.

11 पैकी 3 सामन्यात भारत विजयी

सध्याच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजला हरवलं आहे. आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 सामने झाले. त्यातील 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तर 3 सामन्यात भारताला विजय मिळवता आला. ओव्हल मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया केवळ दुसऱ्यांदाच सामना झाला. 1999 च्या विश्वचषकानंतर तब्बल 20 वर्षांनी ओव्हल मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने आले. 1999 च्या विश्वचषकातील सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता.

4 शतकी खेळी करणारा पहिला भारतीय खेळाडू

धवनने याआधी 2015 च्या विश्वचषकात दोन शतकं झळकवली होती. पहिलं शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर दुसरं आयर्लंडविरुद्ध होतं.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धवनने 137 धावा ठोकल्या होत्या.  त्यानंतर आयरलँडविरुद्ध सामन्यात त्याने 85 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.

यानंतर कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनने शतकी खेळी केली. तर इंग्लंडच्या मैदानात वनडे सामन्यात चार शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

सर्वात वेगवान 1 हजार धावा

वर्ल्ड कपमध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवनची पहिल्या क्रमांकावर नोंद झाली आहे. धवनने ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट, न्यूझीलंडच्या नॅथन अॅस्ले आणि मार्टिन गप्टील या खेळाडूंना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या मैदानात सर्वात वेगवान 1 हजार धावा करणारा खेळाडू म्हणूनही शिखर धवनची नोंद झाली आहे.

विश्वचषकात सर्वाधिक शतकं भारताच्या नावे

विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला नंबर लागतो. त्यांनी आतापर्यंत 26 शतकी खेळी केल्या आहेत. मात्र 5 जूनला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिट मॅन रोहितच्या शतकी खेळीमुळे त्यात बरोबरी झाली होती. त्यानंतर काल 10 जूनला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियातील शिखर धवनच्या शतकामुळे ते 27 शतक भारताच्या नावे नोंद झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे 26 इतक्या शतकांची नोंद विश्वचषकात आहे. यामुळे शतकांच्या शर्यतीत भारतीय संघानेच बाजी मारली आहे.

पहिला विजय

यंदाच्या विश्वचषकातील हा दुसरा विजय आहे.  सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर यंदाच्या विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली होती. दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्स राखत भारताने मात केली होती आणि या विश्वचषकातला पहिला विजय नोंदवला होता. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा भारताने 6 विकेट्स राखून यशस्वी पाठलाग केला. रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 122 धावांचं योगदान दिलं आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित बातम्या :

रोहित शर्माच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *