AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus | ‘ऑस्ट्रेलियाचं ठरलं’, भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी 11 खेळाडूंची निवड

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असं ऑस्ट्रेलियन टीमचे कोच जस्टीन लँगर यांनी सांगितलं आहे.

Ind Vs Aus | 'ऑस्ट्रेलियाचं ठरलं', भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी 11 खेळाडूंची निवड
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Dec 25, 2020 | 1:53 PM
Share

मेलबर्न :  टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India Boxing Day Test) यांच्यात उद्यापासून (26 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. एमसीजीवर ही मॅच होणार आहे. दुसऱ्या कसोटी मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन संघात कुणाला संधी मिळणार, काही बदल होणार का?, अशी उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना होती. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचे कोच जस्टीन लँगर यांनी यावर भाष्य करत दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असं सांगितलं आहे. (Ind Vs Aus 2nd test match 11 Player Australian Coach justin Langer Announces)

“भारताविरुद्ध शनिवारी सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त कोणतीही अनुचित घटना घडायला नको. अ‌ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताला केवळ 36 धावांत गारद करुन 8 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. इतका मोठा आणि शानदार विजय मिळवल्यानंतर टीममध्ये काही बदल करण्याची काही गरज आहे असं वाटतं नाही”, असं जस्टीन लँगर म्हणाले. यावरुन हे स्पष्ट आहे की ऑस्ट्रेलियन संघात दुसऱ्या कसोटीसाठी कोणताही बदल करण्यात येणार नाही.

“पहिल्या कसोटीत इतका शानदार खेळ केल्यावर दुसऱ्या कसोटीसाठी बदल करणं निश्चित योग्य नाही. पहिल्या कसोटीत जो संघ खेळला तोच संघ पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलियन संघ मालिका सुरु होण्यापूर्वीपासून फिटनेसशी झुंजतो आहे. आमच्या अनेक खेळाडूंना दुखापती होत आहेत. धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुखापतीच्या कारणास्वत बाहेर जावं लागलं आहे. वॉर्नरच्या जागी जो बर्न आणि मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज सीन ऐबॉट कोरोना प्रोटोकॉलमुळे दुसरी कसोटी खेळू शकणार नाही”, असं लँगर म्हणाले.

अशी आहे ऑस्ट्रेलियन टीम : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेट कीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन, जोश हेजलवुड

दुसरीकडे भारतानेही दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे.  दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल आणि  मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने सिराज आणि गिलचे कसोटी पदार्पण ठरणार आहे. मोहम्मद सिराजला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही.

अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

(Ind Vs Aus 2nd test match 11 Player Australian Coach justin Langer Announces)

हे ही वाचा

AUS v IND, Boxing Day Test | पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहाला हटवलं, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 4 मोठे बदल

दुखापतग्रस्त टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज क्रिकेटपासून आणखी काही महिने दूर

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...