Ind Vs Aus: ‘अरे फिल्टर वाली दीदी…’, भारताच्या पराभवावर टिप्पणी केल्याने पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल

हार्दीक पांड्याच्या ट्विटला पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने उत्तर दिले आहे.

Ind Vs Aus: अरे फिल्टर वाली दीदी..., भारताच्या पराभवावर टिप्पणी केल्याने पाकिस्तानी अभिनेत्री ट्रोल
'अरे फिल्टर वाली दीदी...
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 22, 2022 | 8:09 AM

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सगळ्या टीमकडून कसून सराव सुरु आहे. त्याचबरोबर मैदानावरची राजनीती आतापासून आखली जात आहे. तसेच काही दिग्गज ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीचा अंदाज बांधत आहेत. दोन दिवसांपुर्वी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली T20 मॅच झाली. टीम इंडिया (Team India) हारल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने एक ट्विट केलं आहे.

आशिया चषकात टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाल्यापासून पाकिस्तानी चाहते अधिक सतर्क झाले आहेत. कारण पाकिस्तान टीम आशिया चषकात अंतिम लढतीमध्ये हारला. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवरती सुद्धा चाहत्यांनी जोरदार टीका केली.

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडिया पहिली मॅच हारल्यानंतर हार्दीक पांड्याने एक ट्विट केले होते. त्यामध्ये आम्ही यातून शिकू, याच्यापेक्षा आम्ही भारी होऊ, सगळ्या चाहत्यांचे आभार असा आशय ट्विटमध्ये आहे.

हार्दीक पांड्याच्या ट्विटला पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीने उत्तर दिले आहे. ती म्हणतं आहे की 23 तारखेची मॅच सुद्धा हारा म्हणजे त्यातून तुम्हाला अधिक शिकायला मिळेल.

सेहर शिनवारी असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. तिला टीम इंडियाच्या चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. तिला अनेकांनी पाकिस्तानची पहिली इकॉनॉमी सुधारा, टीम इंडियाला बोलताना विचार कर…अशा पद्धतीच्या कमेंट आल्या आहेत.

एका टीम इंडियाच्या चाहत्याने ‘अरे फिल्टर वाली दीदी तुम्ही टीम इंडियाची चिंता करु नका”