Legends League : 13 चेंडूत 64 धावा, गंभीरच्या जोडीदाराची सुपर फटकेबाजी

गौतम गंभीर कर्णधार असलेल्या इंडिया कॅपिटल्सने 198 इतकी मोठी धावसंख्या उभारली होती.

Legends League : 13 चेंडूत 64 धावा, गंभीरच्या जोडीदाराची सुपर फटकेबाजी
Legends LeagueImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 7:21 AM

मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली लेजेंड्स लीग (Legends League) ही स्पर्धा पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण माजी खेळाडू पुन्हा चांगला खेळ करताना दिसत आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ICC) अधिक खेळण्याची संधी मिळाली नाही, असे खेळाडू आता चमकदार कामगिरी करीत आहेत. टीम इंडियाचे (Team India) माजी खेळाडू सुद्धा अधिक चांगली कामगिरी करीत आहेत.

ज्या माजी खेळाडूंना विविध कारणामुळे आंतरराष्ट्रीय खेळामधून बाहेर पडावं लागलं. त्यापैकी एक म्हणजे सोलोमन मीर आहे. त्याने काल इंडीया कॅपिटल टीमकडून खेळताना चांगली कामगिरी केली. त्याची फटकेबाजी पाहून मैदानात चाहते खूष झाले.

लखनौमध्ये झालेल्या कालच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्सने भिलवाडा किंग्जचा 78 धावांनी पराभव केला.

हे सुद्धा वाचा

गौतम गंभीर कर्णधार असलेल्या इंडिया कॅपिटल्सने 198 इतकी मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामध्ये झिम्बाब्वेचा माजी फलंदाज सोलोमन मीर याने फक्त 38 चेंडूत 82 धावा केल्या.

सोलोमन मीरने गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. त्यामुळे प्रेक्षकांना मैदानात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे सोलोमनने केवळ 13 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर आपल्या डावात 64 धावा लुटल्या.

सोलोमन मीर हा चांगला झिम्बाब्वेचा फलंदाज होता. परंतु त्याच्यावर काही राजकीय हस्तक्षेप केल्याचा त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार नाही असं पत्र देण्यात आलं. त्यामुळे त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.