AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : के.एल राहुल ‘शेर’ तर स्टोक्स-बेअरस्टो ‘सव्वाशेर’, टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन

टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही.

Ind vs Eng : के.एल राहुल 'शेर' तर स्टोक्स-बेअरस्टो 'सव्वाशेर', टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन
ind vs Eng 2nd ODI
| Updated on: Mar 27, 2021 | 12:08 PM
Share

पुणे : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला (Ind vs England 2nd ODI) 6 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. के.एल. राहुलच्या (K L Rahul) धमाकेदार शतकावर जॉनी बेअरस्टो (jonny bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी पाणी फेरलं. जॉनी बेअरस्टोने 124 धावांची खेळी केली तर स्टोक्सने 99 धावा फटकावताना 10 षटकार लगावले. इंग्लंडने हा सामना अतिशय सहज जिंकला. भारताला 336 धावा करुनही सामना गमवावा लागला. म्हणजेच भारताने धावांचा डोंगर उभा केलेला असतानाही भारतीय बोलर्सला तो स्कोअर वाचवणं शक्य झालं नाही. भारताच्या पराभवाला दोन खेळाडू कारणीभूत ठरले. (Ind vs Eng 2nd ODI krunal Pandya And Kuldeep Yadav bad Bowling Performance)

कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने धावांची खिरापत वाटली

टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

दुसरीकडे कुलदीपनेही तोच कित्ता गिरवला. कुलदीपने 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिले. त्यालाही 84 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. तसंच कुलदीपकडून क्षेत्ररक्षणही म्हणावं असं झालं नाही. तुफानी अंदाजात बॅटिंग करणाऱ्या बेन स्टोक्सचा कॅच 34 ओव्हर्समध्ये कुलदीपने सोडला. जो कॅच पकडायला हवा होता त्याचं षटकारात रुपांतर झालं.

इंग्लंडची धमाकेदार सुरुवात

भारताने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीने जबरदस्त सुरुवात केली. शतकी भागिदारीनंतर धावांचा वेग वाढवण्याच्या नादात जेसन रॉय धावबाद झाला. रोहित शर्माने त्याला धावबाद केलं. पण जेसनने 52 चेंडूत 55 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाचा समावेश होता. जेसन रॉय आणि बेयरस्टो दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

बेन स्टोक्सचा झंझावात, 52 चेंडूत तब्बल 99 धावा

जेसन रॉय धावबाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने मैदानावर येत जॉनी बेयरस्टोसोबत डावाला आकार दिला. दोघांनी एकमेकांच्या साथीने जबरदस्त फलंदाजी केली. बेन स्टोक्स आणि बेयरस्टो दोघांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं. दरम्यान, बेयरस्टोने आपलं शतक पूर्ण केलं. तर बेन स्टोक्सने देखील जलद गतीने शतकाच्या दिशेला वाटचाल केली. पण त्याचं शतक पूर्ण होण्यासाठी अवघ्या एका धावाची गरज असताना भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूत तब्बल 99 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार तर 10 षटकार लगावले.

बेयरस्टोच्या 112 चेंडूत 124 धावा

बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर लगेच पुढच्या षटकात जॉनी बेयरस्टो देखील झेलबाद झाला. भारताच्या प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. बेयरस्टोने 112 चेंडूत 124 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार तर 7 षटकांचा समावेश आहे. बेयरस्टोनंतर लगेच मैदनात उतरलेला जॉस बटलरही स्वस्तार तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णाने मोठ्या चालाखीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लियम लिविंगस्टो आणि डेव्हिड मलान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे संयमी खेळी करत या जोडीने इंग्लंडला विजयी केलं. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.

हे ही वाचा :

IND vs ENG 2nd ODI Live Score : स्टोक्सचा झंझावात, इंग्लंडचा भारतावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.