AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्… नेमकं काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी- 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना आज रंगणार आहे. आता या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाने नेमकं काय केले ते पाहा...

IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्... नेमकं काय?
| Updated on: Jul 01, 2026 | 10:13 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर हा पहिला टी-20 सामना खेळणार आहेत. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे ध्येय असणार आहे. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे भारतीय संघ वैभव सूर्यवंशीला संधी देईल याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. या दरम्यान इंग्लंड संघाने आता 24 तासआधीच भारतीय संघाला एक ऑपन चॅलेंज दिले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. यजमान इंग्लंडने चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी आपला अंतिम 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. इंग्लंडचा संघ हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. जोस बटलर, फिल सॉल्ट आणि सॅम करन यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश आहे. या 11 खेळाडूंचा सामना करणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल. ‘मेन इन ब्लू’ला एक मजबूत संघ मैदानात उतरवावा लागेल. पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडसाठी फिल सॉल्ट आणि जोस बटलर डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, ज्यामुळे डावाची वरची फळी पूर्ण होईल.

पुढे, अष्टपैलू जेकब बेथेल चौथ्या क्रमांकावर मधल्या फळीची सुरुवात करू शकतो. विल जॅक्स पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर यष्टीरक्षक-फलंदाज टॉम बँटन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अष्टपैलू सॅम करन सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. गोलंदाजी विभागात फिरकी गोलंदाज लियाम डॉसन, आदिल रशीद आणि वेगवान गोलंदाज साकिब महमूद व ल्यूक वूड यांचा समावेश असेल. वेगवान गोलंदाजी विभागात सॅम करन त्यांना साथ देईल.

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग Xi

फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद आणि ल्यूक वूड.

टी-20 मालिकांचे वेळापत्रक बुधवार, 1 जुलै – पहिला टी20, बँक्स होम्स रिव्हरसाइड, चेस्टर-ले-स्ट्रीट, रात्री 10 वाजता

शनिवार, 4 जुलै – दुसरा टी20, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, संध्याकाळी 7 वाजता

मंगळवार, 7 जुलै – तिसरा टी20, ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, रात्री 10 वाजता

गुरुवार, 9 जुलै – चौथा टी20, सीट युनिक स्टेडियम, ब्रिस्टल, रात्री 10 वाजता

शनिवार, 11 जुलै – पाचवा टी20, युटिलिटा बाऊल, साउथहॅम्प्टन, संध्याकाळी 7 वाजता

Follow Us
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत