Who Is Sahibzada Farhan : एका हाफ सेंच्युरीनंतर इतका माज, AK-47 सारखी बंदुक दाखवणारा हा साहिबझादा फरहान कोण आहे?
Who Is Sahibzada Farhan :पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबझादा फरहानने कालच्या सामन्यात एक संतापजनक कृती केली. त्यामुळे नेटीझन्सच्या तो निशाण्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध कालच्या सामन्यात त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. त्यानंतर मैदानातील त्याची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. हा साहिबझादा फरहान कोण आहे? जाणून घ्या.

Who Is Sahibzada Farhan आशिया कप टुर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळणं अनेकाना मान्य नाहीय.पाकिस्तान विरुद्ध आपण खेळू नये म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शनही झालं. याला कारण आहे पहलगाम दहशतवादी हल्ला. एप्रिल महिन्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पहलगाम येथे निरपराध 26 भारतीय पर्यटकांची धर्म विचारुन हत्या केली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं.आजही भारतीय हा हल्ला विसरलेले नाहीत. भारतीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल तीव्र विरोधाच्या भावना आहेत. त्यामुळेच आशिया कप स्पर्धेत आपण पाकिस्तान विरुद्ध खेळू नये असा सार्वत्रिक सूर आहे. पण भारत सरकारने बहुदेशीय टुर्नामेंट असल्याने परवानगी दिली. द्विपक्षीय सीरीज पाकिस्तान विरुद्ध खेळायची नाही, हे भारताच धोरण आहे.
टीम इंडिया मनावर दगड ठेऊन पाकिस्तान विरुद्ध खेळत आहे. असं असताना एका पाकिस्तानी क्रिकेटरने मैदानात संतापजनक कृती केली. या वादग्रस्त कृतीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या पाकिस्तानी खेळाडूच नाव आहे, साहिबझादा फरहान. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी साहिबझादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. साहिबझादाने 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. साहिबझादाने अर्धशतकाचं सेलीब्रेशन ज्या पद्धतीने केलं त्यानंतर सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. साहिबझादाने अर्धशतकानंतर बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची एक्शन केली. साहिबझादा फरहानने बॅटला एके-47 ची बंदुक बनवली. फक्त एका अर्धशतकानंतर साहिबझादा फरहानने इतका माज दाखवला.
कोण आहे साहिबझादा फरहान?
साहिबझादा फरहान हा पाकिस्तानचा उदयोन्मुख खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला T20 मध्ये आपलं स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली. इस्लामाबाद युनायटेडकडून वर्ष 2025 च्या सीजनमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. त्यामुळे पाकिस्तानी टीमसाठी T20I मध्ये ओपनर म्हणून तो पहिली चॉइंस बनला. साहिबझादा फरहानने वयाच्या 17 व्या वर्षी पाकिस्तानच्या देशातंर्गत क्रिकेटमध्ये T20 डेब्यु केला. 2016 पासून त्याने एकूण 4500 धावा केल्या. वयाच्या 22 व्या वर्षी 2018 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने हरारेमध्ये डेब्यू केला. पण तीन सामन्यानंतर त्याला संघातून डच्चू मिळाला. पुन्हा 2024 साली त्याने संघात पुनरागमन केलं.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचं प्रदर्शन कसं?
साहिबझादा फरहानने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा केल्या. पण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनात ते सातत्य दाखवता आलं नाही. पण 2025 च्यी पीएसएल सीजनमध्ये त्याने 12 सामन्यात 449 धावा केल्या. त्यानंतर बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेत त्याने T20 मध्ये चांगली कामगिरी केली. सहा सामन्यात त्याने तीन अर्धशतकं झळकावली.
