IND vs PAK : भारताकडून हरल्यानंतर शाहिद आफ्रिदीने जावयाला चांगलचं धुतलं, स्पष्टच बोलला की, त्याला..

IND vs PAK : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याची खूप उत्सुक्ता असते. मॅचआधी त्यांची भरपूर मतप्रदर्शनं सुरु असतात. पण प्रत्यक्ष मॅचच्या निकालानंतर त्यांचा सगळा राग बाहेर निघतो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी सुद्धा याला अपवाद नाहीय.

IND vs PAK : भारताकडून हरल्यानंतर शाहिद आफ्रिदीने जावयाला चांगलचं धुतलं, स्पष्टच बोलला की, त्याला..
shahid afridi
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 11:37 AM

Shahid Afridi : पाकिस्तानला भारताविरुद्ध खेळण्याची खूप खुमखुमी असते. पण जेव्हा ते हरतात तेव्हा गडबडून जातात. क्रिकेट फॅन्स आणि माजी क्रिकेटपटू दोघांची अशीच स्थिती होते. आता शाहिद आफ्रिदीचचं घ्या. भारताविरुद्ध मोठमोठी वक्तव्य करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला भारताकडून झालेला संघाचा पराभव पचवता आला नाही. पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदी इतका चिडला की, त्याने आपला जावई शाहीन आफ्रिदीलाही सोडलं नाही.

भारताविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शाहिद आफ्रिदीने या मॅचनंतर पाकिस्तानात एका टीव्ही शो मध्ये आपलं मत मांडलं. त्याने 3 खेळाडूंवर निशाणा साधला. यात एक नावं शाहीन आफ्रिदीचं आहे. जो त्याचा जावई आहे. शाहिद आफ्रिदी भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बोलताना म्हणाला की, ‘मला निर्णय घ्यायचा असेल तर मी बाबर आजम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या तिघांना टीम बाहेर काढेन’

शाहिद आफ्रिदीच्या मताशी मोहम्मद युसूफही सहमत

शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “मी दीर्घकाळापासून टीमसोबत आहे पण रिझल्ट जसे मिळायला पाहिजेत, तसे मिळत नाहीयत. म्हणून आता या तिघांना बाहेर काढून नव्या खेळाडूंना चान्स देण्याची वेळ आलीय” शाहिद आफ्रिदीच्या या मताशी माजी पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद युसूफ सुद्धा सहमत आहे. त्याने सुद्धा एक्स हँडलवर पोस्ट करुन बाबर, शाहीन आणि शादाब या तिघांना बाहेर करुन नव्या खेळाडूंना संधी देण्याचं मत मांडलं. मोहम्मद यूसुफच्या मते या तीन खेळाडूंचं T20 करिअर आता संपल्यात जमा आहे.


तिघांचं प्रदर्शन कसं?

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या मॅचमध्ये बाबर आजमने 7 चेंडूत 5 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने 2 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. शादाब खानने 1 ओव्हरमध्ये 17 रन्स दिले. त्याशिवाय तो बॅटने सुद्धा काही खास करु शकला नाही. या तिन्ही सिनियर्सचं खराब प्रदर्शन पाकिस्तानच्या पराभवाचं एक प्रमुख कारण आहे.