AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध जिंकणं थोडं अवघड, मॉर्ने मॉर्केल यांचा टीम इंडियावर भरवसा नाय काय? एक भीती बोलून दाखवली

Morne Morkel On Team India: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. आता मालिकेच्या एकदिवसआधी भारतीय संघाचे गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्केलने संघाला एक मोठा इशारा दिला आहे.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध जिंकणं थोडं अवघड, मॉर्ने मॉर्केल यांचा टीम इंडियावर भरवसा नाय काय? एक भीती बोलून दाखवली
| Updated on: Aug 14, 2026 | 10:09 AM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. उद्यापासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा गॉलवर रंगणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघाला सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. आता मालिकेच्या एकदिवसआधी भारतीय संघाचे गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्केलने संघाला एक मोठा इशारा दिला आहे.

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी “संघाच्या वेगवान गोलंदाजांना श्रीलंकेतील उष्णता, आर्द्रता आणि कुकाबुरा चेंडूच्या बदलत्या स्वरूपाशी लवकर जुळवून घ्या, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत लय कायम ठेवणे आणि दबाव निर्माण करण्याचे नवनवीन मार्ग शोधणे महत्त्वाचे ठरेल, ” असे त्यांनी अधोरेखित केले. जसप्रीत बुमराहला मालिकेतून वगळल्याने भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागाला मोठा धक्का बसला आहे. आता मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाजी आक्रमणातील सर्वात अनुभवी सदस्य आहे, तर प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि नुकताच संघात सामील झालेला आकिब नबी हे इतर पर्याय आहेत.

मॉर्ने मॉर्केल काय म्हणाले?

जेव्हा चेंडूचा कडकपणा कमी होतो, तेव्हा भारतीय वेगवान गोलंदाजांच्या योजनांमध्ये बदल करावा लागेल, आमच्याकडे कौशल्य आहे आणि  एक योजना असेल, पण जेव्हा आम्ही श्रीलंकेत येऊ, तेव्हा सर्वात मोठे आव्हान म्हणजे उष्णता, आर्द्रता आणि कुकाबुरा चेंडूचे लवकर सॉफ्ट होणे हे असेल. 25 किंवा 30 षटकांनंतर चेंडू सॉफ्ट होईल, त्यामुळे आपल्याला त्यासाठी तयार राहावे लागेल. अशा परिस्थितीत, सर्व काही तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. जर तुम्ही कमी षटकांची गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज असाल, तर तुम्ही चेंडूमध्ये लावलेली ऊर्जा आणि योग्य ठिकाणी टाकलेला चेंडू तुम्हाला नेहमीच संधी मिळवून देईल.”

मॉर्ने मॉर्केल यांचा भारतीय संघाला सल्ला

मॉर्केल यांना वाटते की, “भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या सुरुवातीच्या टप्प्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि चेंडू जुना झाल्यावर संधी निर्माण करण्यासाठी इतर पद्धतींचा वापर करावा. जसा कसोटी सामना पुढे जाईल, तशी चेंडूची उसळी थोडी असमान होईल अशी आशा आहे. मुद्दा हा आहे की, आपण सातत्याने उत्साहाने गोलंदाजी करून दबाव कसा निर्माण करू शकतो, कारण गेल्या काही महिन्यांत आपण जास्त लाल चेंडूचे क्रिकेट खेळलेलो नाही; त्यामुळे त्यात परत येणे एक आव्हान असेल.”

दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज मॉर्न मॉर्केल यांचा विश्वास आहे की, “चेंडू वेगाने टप्पा टाकून आणि शिस्तबद्ध टप्पा राखून श्रीलंकेच्या परिस्थितीतही फलंदाजांना अडचणीत आणता येते. जसा जसा कुकाबुरा चेंडूचा कडकपणा कमी होईल, तसे गोलंदाजांना अधिक नाविन्यपूर्ण पद्धतींचा प्रयोग करावा लागेल. माझ्या खेळण्याच्या दिवसांमध्येही मला वाटायचे की, जर तुम्ही चांगल्या लेंथवर सातत्याने आणि आक्रमक गोलंदाजी करून फलंदाजाला अनेक प्रश्न विचारले, तर तुम्हाला चांगले निकाल मिळण्याची नेहमीच संधी असते.”

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता