AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: भर मॅचमध्ये विंडिजकडून नको ‘ते’ कृत्य, पाहताच सुनील गावस्करांना राग अनावर

Sunil Gavaskar On West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी-२० सामना काल रंगला. जो भारतीय संघाला गमवावा लागला. सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने जे कृत्य केले त्यावर सुनील गावस्कर प्रचंड भडकले.

Sunil Gavaskar: भर मॅचमध्ये विंडिजकडून नको 'ते' कृत्य, पाहताच सुनील गावस्करांना राग अनावर
| Updated on: Oct 15, 2026 | 9:08 AM
Share

IND vs WI 4th T20: हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर प्रचंड संतापले. समालोचनादरम्यान वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफने जशी गोलंदाजी केली त्यावर गावस्कर भडकले. गावस्करांनी आता जोसेफवर गंभीर आरोप केले आहेत.

शमर जोसेफचा एक वेगवान शॉर्ट बॉल थेट अर्शदीप सिंगच्या खांद्यावर लागला. चेंडू लागल्यानंतर अर्शदीप वेदनेने विव्हळत असल्याचे दिसत होते, पण त्याने फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूंमध्ये जलद धावा करणे आवश्यक होते. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने अर्शदीपला दुखापतग्रस्त होऊन निवृत्त होण्याचा सल्लाही दिला, पण त्याने क्रीजवरच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या चेंडूंमध्येही अर्शदीपला शॉर्ट बॉल्सचा सामना करावा लागला.

स्टंप्सवर किंवा यॉर्करवर गोलंदाजी करण्याऐवजी, शमर जोसेफने पुन्हा एक शॉर्ट बॉल टाकला, सुदैवाने जो अर्शदीप लागला नाही. यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावस्कर यांनी जोसेफच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गावस्कर म्हणाले, “तो त्याला लक्ष्य करत आहे. स्टंप्स अगदी समोर असताना तो फलंदाजावर हल्ला का करत आहे?”

गावस्कर यांची ही टिप्पणी सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली. फलंदाज स्पष्टपणे जखमी असताना त्याच्या शरीरावर सतत चेंडू फेकण्याची काय गरज असं म्हणत अनेक चाहत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्शदीप क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. पाच धावा करून तो दुखापतग्रस्त होऊन रिटारयर्ड  झाला आणि मैदानाबाहेर गेला. बंगळूरुमधील निर्णायक सामन्यासाठी तो तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर भारतीय संघाला हा एक मोठा धक्का ठरू शकतो.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने कर्णधार शाई होपच्या शानदार शतकाच्या जोरावर तीन गडी गमावून २४७ धावा केल्या. होपने अवघ्या ५० चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावा करून आपल्या संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. प्रत्युत्तरात, भारताला केवळ २२३ धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून कीमो पॉलने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४१ धावांत पाच बळी घेतले आणि भारताचा धावांचा पाठलाग पूर्णपणे उधळून लावला. कॅरिबियन संघाने हा सामना २४ धावांनी जिंकून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. आता या मालिकेचा निकाल बंगळूरु येथील अंतिम सामन्यात लागेल.

Follow Us
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...