IND vs SA | विशाखापट्टणम कसोटीत भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी धुव्वा

रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने आपला दुसरा डाव 323 धावांवर घोषित केला होता. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.

IND vs SA | विशाखापट्टणम कसोटीत भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी धुव्वा

विशाखापट्टणम : विशाखापट्टणममध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 203 धावांनी पराभव (India beats S. Africa Vishakhapattanam Test) केला. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने पाचव्या दिवशी विजय मिळवला. द. आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने विजयी आघाडी घेतली आहे.

भारताकडून मोहम्मद शमीने पाच, रविंद्र जाडेजाने चार, तर आर अश्विनने एक बळी घेतला. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात 191 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी न दिल्यामुळे आफ्रिकेचा डाव गडगडला.

रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने आपला दुसरा डाव 323 धावांवर घोषित केला होता. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं.

सलामीवीर म्हणून पहिलीच कसोटी, रोहितचं दोन्ही डावात शतक

पहिल्या डावातील शतक झळकावलेल्या डीन एल्गरला टीम इंडियाने चौथ्या दिवशी झटपट बाद केलं. रविंद्र जाडेजाने एल्गरला पायचित करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि एडन मार्क्रम यांनी आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, केशव महाराज हे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. अखेरच्या दिवशी आफ्रिकेचा संघ 8 विकेट्स गमावून 117 धावांपर्यंत पोहचला होता. पिडीट आणि मुथुस्वामी यांनी अखेरच्या षटकांमध्ये भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना (India beats S. Africa Vishakhapattanam Test) झुंजवलं.

रो’हिट’ मॅन

रोहित शर्माने कसोटीत पहिल्यांदाच सलामीला येत नवे विक्रम नावावर केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावातील 176 धावांच्या खेळीनंतर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक ठोकलं. सुनील गावकर, राहुल द्रविड, विराट कोहली या दिग्गजांच्या रांगेत आता रोहितचाही समावेश झाला आहे.

पहिल्या डावात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 176 धावा रचल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही सलामीला येत शतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत उभं केलं. दुसऱ्या डावात 127 धावा करुन रोहित बाद झाला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए मैदानावर झाला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 7 बाद 502 धावा करुन डाव घोषित केला. तर दक्षिण आफ्रिकेला 431 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला दुसऱ्या डावात केवळ 7 धावा करता आल्या आणि तो बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी मोठी भागीदारी (Rohit Sharma records) रचण्याचा प्रयत्न केला. पण पुजारा 81 धावा करुन माघारी परतला. यानंतर रोहितने त्याचं दुसऱ्या डावातील शतक पूर्ण केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *