IND vs PAK: टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानची जगासमोर काढली लायकी, पराभवाची धुळ चारली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला
भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना असला की चर्चा तर रंगतेच. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा समोर आले आहेत विजय हा बहतेक वेळा भारतीय संघाचाच होता.

भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना असला की चर्चा तर रंगतेच. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्येही ही वेगळाच क्रेझ असतो. आता या दोन्ही संघामध्ये सामना रंगला आहे. दोन संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळले आहेत आणि नेहमीप्रमाणे भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहेत. भारतीय संघाने हा सामना जिंकला. एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय सब-ज्युनियर पुरुष संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-1 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. रोमित पाल (5 व्या मिनिटाला), कर्णधार केतन कुशवाहा (12 व्या मिनिटाला) आणि शाहरुख अली (13 व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला आशियाई चॅम्पियन बनण्यास मदत झाली. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ एलिट पूलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
भारताने आपली ताकद दाखवली
अचूक पास आणि शिस्तबद्ध रणनीतीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात सुरुवातीलाच आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये रोमित पालने पाकिस्तानी गोलरक्षकाला चकवून पहिला गोल केला, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कर्णधार केतन कुशवाहाने (12 व्या मिनिटाला) गोल करून भारताला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर लगेचच शाहरुख अलीने आणखी एक गोल करून 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. मोहम्मद उस्मानच्या (16 व्या मिनिटाला) गोलमुळे पाकिस्तानने पिछाडी कमी केली, परंतु भारतीय बचावफळीने शेवटच्या मिनिटांमध्ये आपली पकड घट्ट ठेवली आणि पुढील गोल रोखले.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत पोहोचून पहिल्या एफआयएच युवा हॉकी फाईव्ह्स विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. महिलांच्या स्पर्धेत, भारतीय सब-ज्युनियर संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात चीनकडून 2-4 ने पराभव पत्करल्यानंतर रौप्य पदक जिंकले. हॉकी इंडियाने सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला 1 लाख रुपये, तर रौप्य पदक विजेत्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला 50,000 रुपये पुरस्कार जाहीर केला आहे.