अभिजीतला भेटायला अगोदरच यायचं होत पण… संजय शिरसाट यांनी गाठले दिपकेंचे घर, थेट..
मंत्री संजय शिरसाट कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या भेटीला पोहोचले. यावेळी तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधला. बराचवेळ दिपकेंच्या घरी संजय शिरसाट होते. यावेळी संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला.

प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे- नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजला. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके जंतर मंतवरवर आंदोलनाला बसले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला गेले. सरकारने अनेकदा भेटीसाठी कॉकरोच जनता पार्टीला प्रस्ताव दिले. मात्र, ते सरकारची भेट नाकारत होते. सरकारने कधी आणि कोणत्यावेळी भेटाचये सांगा, आम्ही 24 तास तयार असल्याचे आंदोलकांना म्हटले. शेवटी कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला पोहोचले. त्यांनी सरकारपुढे 3 मागण्या ठेवल्या. सरकारकडून तात्काळ दोन मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, सर्वात महत्वाची तिसरी मागणीसाठी सरकारने शिष्टमंडळाकडे वेळ मागितला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने वेळ मागितला.
शेवटी शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वीच केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून देण्यात आला. त्यानंतर जंतर मंतरमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. अभिजीत दिपके आनंद साजरा करताना दिसले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय थेट जेंनझींना दिले, त्यांच्याशिवाय हा विजय शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. जेंनझींनी आपली ताकद सरकारला दाखवल्याचे यावेळी त्याने म्हटले. अभिजीत दिपके याच्या घरी भेटीला मंत्री संजय शिरसाट पोहोचले.
यावेळी संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला. हेच नाही तर बऱ्याचवेळ त्याच्या कुटुंबासोबत चर्चा करताना संजस शिरसाट दिसले. अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी म्हटले की, अभिजीतला भेटायला अगोदरच यायचं होतं. मात्र त्याचा राजकीय पडसाद उमटले असते, त्यामुळे भेट टाळली. अभिजीतला आता मोठे यश मिळाले तो माझ्या मतदारसंघातील आहे आणि माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो, त्यावेळेस त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे.
सरकारने अभिजीतच्या मागण्यांची सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून त्याला यश मिळाले, अभिजीतच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्याचं काम केलं. अभिजीत येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये घरी येईल. निश्चितच अभिजीत जेव्हा महाराष्ट्रात येईल त्यावेळेस त्याच्या जीवितेला कुठलाही धोका होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्याला संरक्षण देण्यासाठी मागणी करेल.
