AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानची जगासमोर काढली लायकी, पराभवाची धुळ चारली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला

भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना असला की चर्चा तर रंगतेच. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा समोर आले आहेत विजय हा बहतेक वेळा भारतीय संघाचाच होता.

IND vs PAK: टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानची जगासमोर काढली लायकी, पराभवाची धुळ चारली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला
| Updated on: Jul 26, 2026 | 1:45 PM
Share

भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये सामना असला की चर्चा तर रंगतेच. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्येही ही वेगळाच क्रेझ असतो. आता या दोन्ही संघामध्ये सामना रंगला आहे. दोन संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळले आहेत आणि नेहमीप्रमाणे भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहेत. भारतीय संघाने हा सामना जिंकला. एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय सब-ज्युनियर पुरुष संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 3-1 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. रोमित पाल (5 व्या मिनिटाला), कर्णधार केतन कुशवाहा (12 व्या मिनिटाला) आणि शाहरुख अली (13 व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला आशियाई चॅम्पियन बनण्यास मदत झाली. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ एलिट पूलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारताने आपली ताकद दाखवली अचूक पास आणि शिस्तबद्ध रणनीतीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात सुरुवातीलाच आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये रोमित पालने पाकिस्तानी गोलरक्षकाला चकवून पहिला गोल केला, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कर्णधार केतन कुशवाहाने (12 व्या मिनिटाला) गोल करून भारताला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर लगेचच शाहरुख अलीने आणखी एक गोल करून 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. मोहम्मद उस्मानच्या (16 व्या मिनिटाला) गोलमुळे पाकिस्तानने पिछाडी कमी केली, परंतु भारतीय बचावफळीने शेवटच्या मिनिटांमध्ये आपली पकड घट्ट ठेवली आणि पुढील गोल रोखले.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत पोहोचून पहिल्या एफआयएच युवा हॉकी फाईव्ह्स विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. महिलांच्या स्पर्धेत, भारतीय सब-ज्युनियर संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात चीनकडून 2-4 ने पराभव पत्करल्यानंतर रौप्य पदक जिंकले. हॉकी इंडियाने सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला 1 लाख रुपये, तर रौप्य पदक विजेत्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला 50,000 रुपये पुरस्कार जाहीर केला आहे.

Follow Us
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...