AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंच्या लग्नासाठी असंख्य फोन; आईने सांगितलं, कशी हवी सूनबाई?

Abhijeet Dipke : तरुणांबद्दलच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावर सुरू झालेल्या एका मोहिमेचं रुपांतर देशव्यापी निदर्शनांमध्ये झालं. या मोहिमेच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या लग्नावर त्यांच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंच्या लग्नासाठी असंख्य फोन; आईने सांगितलं, कशी हवी सूनबाई?
अभिजीत दीपके आणि त्यांची आईImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 26, 2026 | 1:38 PM
Share

महिनाभराहून अधिकचा ठिय्या, उपोषण, संसदेवरील धडक मोर्चा, पोलिसांचा लाठीजार्ज.. इतका तीव्र संघर्ष करूनही जंतर-मंतरवरून न हटणाऱ्या युवाशक्तीसमोर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला नमतं घ्यावं लागलं. यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांचं मोठं यश मानलं जात आहे. सीजेपीच्या नेतृत्वाखालीच जंतर-मंतर याठिकाणी असंख तरुण आणि विद्यार्थी जमले होते. या मोठ्या यशानंतर आता अभिजीत यांच्या आईवडिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी मुलाच्या लग्नावरही प्रतिक्रिया दिली आहे. सीजेपीचं आंदोलन यशस्वी झाल्यापासून अभिजीत दीपके यांच्या लग्नासाठी असंख्य फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लग्नासाठी येत आहेत असंख्य फोन

“त्याच्या लग्नासाठी भरपूर फोन येत आहेत. आधीही येतच होते, पण आता आणखी जास्त येत आहेत. पण त्याच्या लग्नाचा योग जेव्हा येईल तेव्हा बघू. आधी त्याला यातून बाहेर पडू द्या”, अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांच्या आईने दिली आहे. तर सूनबाई कशी पाहिजे, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “आता हे त्याच्या मनावर आहे. सून सर्वसामान्य, साधारण असावी, अशी मला अपेक्षा होती. पण आता तो एवढ्या लेव्हलला गेला आहे की त्यामुळे आता पत्नी निवडण्याचा निर्णय त्याच्यावर आहे. आयुष्याची जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. आम्ही त्याला पाठिंबा देण्याचं काम करणार आहोत. आता आधीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी आई-वडील म्हणायचे, या मुलीशी लग्न कर, तर लग्न व्हायचं. आता तसं नाही. आता मुलांचे विचार वेगळे आहेत.”

यावेळी अभिजीत यांच्या आईवडिलांनी त्यांच्या पुढील भूमिकेविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. “त्याच्या भूमिकेविषयी मला काही सांगता येणार नाही. कारण पुढे तो काय करतो हे मलासुद्धा माहीत नाही. आता अभिजीत जी कोणती भूमिका घेईल, त्याला माझा पाठिंबा असेल,” असं आईने स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके यांची कॉकरोच जनता पार्टी अडून बसली होती. अखेर जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ‘आज लोकशाही विजयी झाली’ असं म्हणत त्यांनी सर्व आंदोलकांचं अभिनंदन केलं.

Follow Us
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ