
मुंबई : न्यूझिलंडमध्ये (NZ) अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे मालिकेतील सामने पुर्ण होऊ शकले नाहीत. टीम इंडियाने (IND) एक मॅच जिंकली, T20 च्या दोन मॅचमध्ये पाऊस पडला, त्यानंतर टीम इंडियाने मालिका जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. उद्यापासून टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. उद्या सकाळी सात वाजता ऑकलंडच्या (auckland) मैदानात पहिली मॅच पाहायला मिळणार आहे.
सध्या न्यूझिलंडमध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. उद्याच्या मॅचमध्ये पाऊस पडणार का ? असा प्रश्न असंख्य चाहत्यांना पडला असेल, परंतु हवामान खात्याने उद्याच्या मॅचमध्ये स्वच्छ हवामान राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्याची पुर्ण मॅच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व धवनकडे देण्यात आलं आहे. धवनच्या नेतृत्वाच टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाने न्यूझिलंडच्या टीमचा 3-0 असा पराभव केल्यास टीम इंडिया पुन्हा नंबर अधिक गुणांसह एक नंबरला जाणार आहे. त्यासाठी टीम इंडियाला मोठी कामगिरी करावी लागेल.
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.