IND vs AFG: दिल्लीतून आनंदाची बातमी, भारतीय संघाचा विजय, एकटा अभिषेक शर्मा अफगाणला नडला

IND vs AFG 1st T20: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला ७ गडी राखून पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने १३.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. भारताकडून अभिषेक शर्माने ८२ धावा केल्या.

IND vs AFG: दिल्लीतून आनंदाची बातमी, भारतीय संघाचा विजय, एकटा अभिषेक शर्मा अफगाणला नडला
| Updated on: Sep 13, 2026 | 10:54 PM

भारतीय संघाने अफगाणिस्तान टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली. अरुण जेटली स्टेडियमवर भारताने ७ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची धावसंख्या ५ गडी बाद ४३ होती. तिथून संघाने १५६ धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने अवघ्या १३.४ षटकांत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

अभिषेक शर्माचे २२ चेंडूंत अर्धशतक
अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी अवघ्या १० चेंडूंत ८२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार मारले. अभिषेकने २२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर संजू सॅमसन ८ चेंडूंत १० धावांवर बाद झाला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. या दोघांनी केवळ ५३ चेंडूंचा सामना केला. या भागीदारीत अभिषेकचे योगदान २७ चेंडूंमध्ये ७६ धावांचे होते. इशान किशनने ३३ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. अफगाणिस्तानचे सर्व गोलंदाज महागडे ठरले. फजलहक फारुकीने केवळ दोन षटकांत ३८ धावा दिल्या.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाण संघाची सुरुवात निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर रहमानुल्ला गुरबाजला (०) बाद केले. तोपर्यंत संघाच्या केवळ ५ धावा झाल्या होत्या. कर्णधार इब्राहिम झद्रानसोबत सेदिकुल्ला अटलने सूत्रे हाती घेतली. या दोघांनी २२ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडल्या. झद्रान १० चेंडूंमध्ये ११ धावा करून बाद झाल्यावर ३८ धावांवर संघाची दुसरी विकेट पडली.

उमरझाईने धावसंख्या १५० च्या पुढे नेली. ४३ धावांपर्यंत सेदिकुल्ला अटल (१३), गुलबदिन नायब (२) आणि दरवेश रसूली (२) यांनीही आपल्या विकेट गमावल्या. मोहम्मद नबीने अझमतुल्ला उमरझाईसोबत सहाव्या विकेटसाठी ५६ चेंडूंमध्ये ८३ धावांची भागीदारी करून संघाला शतक पार करून दिले. मोहम्मद नबी २७ चेंडूंमध्ये ३३ धावा करून बाद झाला. अझमतुल्ला ४४ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि तितक्याच चौकारांसह ६४ धावा करून नाबाद राहिला. शिवम दुबेने शेवटच्या षटकात २१ धावा दिल्या आणि यामुळे संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला. भारतासाठी, अर्शदीप सिंगने ४ षटकांत १९ धावा देऊन ३ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us