India vs Australia 2020 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एकूण 140 वेळा आमनासामना, कोण वरचढ, कोण कमजोर?

टीम इंडियाच्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, एकूण 140 वेळा आमनासामना, कोण वरचढ, कोण कमजोर?
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 6:20 PM

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour Australia 2020) आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या दौऱ्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळत आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांची आतापर्यंतची एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरी (One Day Cricket History)पाहणार आहोत. india vs australia head to head records on one day international record cricket

अशी आहे आकडेवारी

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत एकूण 140 सामन्यांमध्ये आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 140 सामन्यांपैकी 78 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 52 वेळा मात केली आहे. तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात खेळलेले एकदिवसीय सामने

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 96 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाचा 39 सामन्यात विजय झाला आहे. तर 51 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.

अखेरच्या 5 एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या अखेरच्या 5 सामन्यात भारताचा बोलबाला राहिला आहे. या 5 पैकी 3 सामन्यात टीम इंडियाने कांगारुंना पराभूत केलं. तर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 2 सामन्यात मात केलीय.

ऑस्ट्रेलियातील अखेरच्या 5 एकदिवसीय सामन्यातील कामगिरी

तसेच ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या अखेरच्या 5 सामन्यातही भारताचाच वरचष्मा राहिला आहे. भारताने या 5 पैकी 3 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला एकदिवसीय सामना

वनडे क्रिकेटला 5 जानेवारी 1971 मध्ये सुरुवात झाली होती. पहिला एकदिवसीय सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळण्यात आला होता. या सामन्याचं आयोजन MCG अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर करण्यात आलं होतं. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 5 विकेट्सने पराभव केला होता. टीम इंडियाने आपली पहिली वनडे मॅच इंग्लंड विरुद्ध खेळली होती. हा एकदिवसीय सामना 13 जुलै1974 मध्ये लीड्समध्ये खेळण्यात आला होता.

एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी

दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी

तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टीम इंडियाचा एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 | ‘गब्बर’कडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा

India vs Australia 2020 | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

india vs australia head to head records on one day international record cricket

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.