AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या डावात 72 धावांची खेळी केली.

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा 'विराट' विक्रम
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली
| Updated on: Feb 09, 2021 | 3:52 PM
Share

चेन्नई : पाहुण्या इंग्लंडने टीम इंडियाचा पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात (India vs England 1st Test) भारतावर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने कसोटीतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तसेच या मालिकेतही 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. फक्त शुबमन गिलने (Shubaman Gill) 50 धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 72 धावांची झुंजार खेळी केली. भारताचा जरी पराभव झाला तरी विराटने या अर्धशतकासह बहुमान आपल्या नावे केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. (india vs england 2021 1st test day 5 virat kohli become first india captain who scored fifty in 4th innings in chennai)

काय आहे विक्रम ?

भारतीय क्रिकेटच्या 89 वर्षांच्या इतिहासात न जमलेली कामगिरी विराटने केली आहे. विराट चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium Chennai) कसोटी सामन्यात चौथ्या डावात अर्धशतक लगावणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. विराटच्या आधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला चेन्नईतील कसोटीमधील चौथ्या डावात 30 पेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या. विराटने या सामन्यात एकूण 104 चेंडूत 72 धावांची खेळी केली.

गॅरी सॉबर्सचा 54 वर्षांपूर्वीचा विक्रम

वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गॅरी सॉबर्स यांनीही चेन्नईतील या मैदानात चौथ्या डावात अर्धशतक लगावण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले परदेशी कर्णधार ठरले होते. त्यांनी ही कामगिरी आजपासून 54 वर्षांपूर्वी म्हणजेच 1967 मध्ये ही कामगिरी केली होती.

विराटच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार

टीम इंडियाचा कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील सलग चौथा पराभव ठरला. फेब्रुवारी 2020 पासून म्हणजेच गेल्या वर्षभरात टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात एकूण 4 कसोटी सामने खेळली आहे. या 4 ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला 2 वेळा न्यूझीलंड तर प्रत्येकी 1 वेळा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभूत व्हाव लागलं आहे.

दरम्यान या पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा कसोटी सामना याच मैदानात 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या दुसऱ्या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहून मॅचचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Test | इंग्लंडचा भारतावर शानदार विजय, टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं

India vs England 1st Test 5th Day Live | कॅप्टन कोहलीची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडचा टीम इंडियावर 227 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

(india vs england 2021 1st test day 5 virat kohli become first india captain who scored fifty in 4th innings in chennai)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.