India vs England 3rd Test | आधी लाजिरवाणा पराभव, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स अँडरसनच्या नावे नकोसा विक्रम

| Updated on: Feb 26, 2021 | 4:31 PM

टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

India vs England 3rd Test | आधी लाजिरवाणा पराभव, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स अँडरसनच्या नावे नकोसा विक्रम
टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
Follow us on

अहमदाबाद : भारतीय संघाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत 10 विकेट्सने शानदार (India vs Engaland 3rd Test) विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. हा सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रापर्यंत आटोपला. या पीचवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी 2 दिवसात 19 तर इंग्लंडच्या फिरकी गोलंजदाजांनी 10 विकेट्स घेतल्या. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉर्ड (stuart broad) आणि जेम्स अँडरसन (james anderson) या अनुभवी गोलंदाजांच्या नावे नकोसा विक्रम झाला आहे. (India vs England 3rd Test james anderson and stuart broad sets bad record)

काय आहे विक्रम ?

इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स अँडरसन या अनुभवी गोलंदाजांना या तिसऱ्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. यासह या दोघांच्या नावे नकोसा विक्रम झाला आहे. हे दोन्ही गोलंदाज तब्बल 120 कसोटीनंतर पहिल्यांदा एका सामन्यात विकेट्स घेण्यास अपयशी ठरले. या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांनी मिळून 19 ओव्हर फेकल्या. यामध्ये दोघांनी 36 धावा लुटवल्या. पण दोघांना एकही विकेट घेता आली नाही.

इंग्लंडला पराभवासह दुहेरी धक्का

इंग्लंडला या पराभवासह दुहेरी धक्का बसला आहे. या अहमदाबादमधील पराभवामुळे इंग्लंडचे आयसीसी टेस्ट चॅम्पियशीपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे इंग्लंडचं मायदेशातील लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळण्याचं स्वप्न अधुर राहिलं आहे.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाच्या आर विनय कुमारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, ट्विटरवरुन दिली माहिती

प्रितीच्या शाहरुखची विजय हजारे करंडकात धमाकेदार कामगिरी, आयपीएल गाजवण्यासाठी उत्सुक

India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं

(India vs England 3rd Test james anderson and stuart broad sets bad record)