AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रितीच्या शाहरुखची विजय हजारे करंडकात धमाकेदार कामगिरी, आयपीएल गाजवण्यासाठी उत्सुक

पंजाबने आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी शाहरुख खानला (shahrukh khan) 5 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

प्रितीच्या शाहरुखची विजय हजारे करंडकात धमाकेदार कामगिरी, आयपीएल गाजवण्यासाठी उत्सुक
पंजाबने आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी शाहरुख खानला (shahrukh khan) 5 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
| Updated on: Feb 26, 2021 | 2:45 PM
Share

इंदूर : सध्या विजय हजारे स्पर्धा 2021 (Vijay Hazare Trophy 2020-21) सुरु आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला. यामध्ये प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मालकीच्या पंजाब किंग्सने तामिळनाडूकडून खेळणाऱ्या शाहरुख खानला (shahrukh khan) आपल्या ताफ्यात घेतलं. शाहरुखने पंजाब किंग्सचा (Punjab Kings) हा निर्णय अगदी योग्य ठरवला आहे. शाहरुख या स्पर्धेत सातत्याने निर्णायक कामगिरी करत आहे. शाहरुख या स्पर्धेत तामिळनाडूसाठी फिनिशर म्हणून नावारुपास येत आहे. (tamilnadu shahrukh khan good performence in vijay hazare trophy 2020 21)

शाहरुख विजय हजारे स्पर्धेत ठरतोय फिनीशर

शाहरुख विजय हजारे स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करतोय. या स्पर्धेत शाहरुखने आतापर्यंत 4 डावांमध्ये बॅटिंग करताना 3 वेळा अर्धशतक लगावलं आहेत. यापैकी 2 वेळा तो नाबाद राहिला आहे. विशेष म्हणजे झारखंड विरुद्धच्या सामन्यात शाहरुखने 47 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह शानदार 51 धावा चोपल्या. यामुळे शाहरुखकडून आयपीएलच्या 14 व्या मोसमात अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

शाहरुखसाठी 5 कोटी 25 लाख

पंजाबने शाहरुख खानला 5 कोटी 25 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. शाहरुखला त्याच्या बेस प्राईजच्या 26 पट जास्त रक्कम मिळाली. शाहरुखची बेस प्राईज ही 20 लाख इतकी होती. शाहरुखला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रिती झिंटा इरेला पेटली होती. त्यामुळं दिल्ली आणि RCB ने खूप रस दाखवून बोली वाढवली. मात्र अखेर शाहरुख पंजाबचाच झाला. शाहरुखने तामिलनाडू प्रिमियर लीगमध्ये शानदार कामगिरी केली होती.

लिलावनंतर अशी आहे पंजाबची टीम

पंजाबने कायम राखलेले खेळाडू

केएल राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूड्डा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि ईशान पोरेल.

पंजाबने खरेदी केलेले खेळाडू

झाय रिचर्डसन (14 कोटी), रिले मेरेडिथ (8 कोटी), शाहरुख खान (5.25 कोटी), मॉझेस हेन्रिक्स(4.20 कोटी), डेव्हिड मालान(1.50 कोटी), फाबियन ऍलेन(75 लाख), जलज सक्सेना(30 लाख), सौरव कुमार(20 लाख) आणि उत्कर्ष सिंग (20 लाख).

संबंधित बातम्या :

IPL 2021 auction | शाहरुख खान प्रिती झिंटाच्या पंजाबकडून खेळणार

Chris Morris | बेस प्राईज अवघी 75 लाख, मात्र ख्रिस मॉरिसला IPL इतिहासातील सर्वात मोठी किंमत!

(tamilnadu shahrukh khan good performence in vijay hazare trophy 2020 21)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.