टीम इंडियाच्या आर विनय कुमारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, ट्विटरवरुन दिली माहिती

आर विनय कुमारने (r vinay kumar) ट्विट करत आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:42 PM, 26 Feb 2021
टीम इंडियाच्या आर विनय कुमारचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, ट्विटरवरुन दिली माहिती
आर विनय कुमारने (r vinay kumar) ट्विट करत आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई : अशोक डिंडानंतर टीम इंडियाच्या  (Team India) आणखी एका स्टार गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आर विनय कुमारने (R Vinay Kumar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.  विनयने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 नोव्हेंबर 2013 मध्ये खेळला होता. विनय कुमार गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. (r vinay kumar has announced retirement from International Cricket)

कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

आर विनय कुमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 31 एकदिवसीय, 9 टी 20 तर एकमात्र टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. यामध्ये त्याने अनुक्रमे वनडेमध्ये 31, टी 20 मध्ये 10 तर टेस्टमध्ये 1 विकेट घेतली होती.

कुमारची आयपीएल कारकिर्द

कुमारने आयपीएलमध्ये 105 सामने खेळले आहेत. यात त्याने 28.25 च्या सरासरीने तसेच 8.39 या इकॉनॉमी रेटने 105 विकेट्स पटकावल्या होत्या. 4 विकेट्स देऊन 40 धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी होती.

संबंधित बातम्या :

VIDEO | Live Interview दरम्यान विराटने अक्षर पटेलला रोखलं, नक्की काय घडलं?

प्रितीच्या शाहरुखची विजय हजारे करंडकात धमाकेदार कामगिरी, आयपीएल गाजवण्यासाठी उत्सुक

(r vinay kumar has announced retirement from International Cricket)