विराटसेनेसाठी दिलासादायक बातमी, यॉर्कर किंगचं संघात पुनरागमन, इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज

टीम इंडियाच्या (india vs england t 20i) ज्यूनिअर यॉर्कर किंग टी नटराजनला (thangarasu natrajan) टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर खांद्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती.

विराटसेनेसाठी दिलासादायक बातमी, यॉर्कर किंगचं संघात पुनरागमन, इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज
टीम इंडियाच्या (india vs england t 20i) ज्यूनिअर यॉर्कर किंग टी नटराजनला (thangarasu natrajan) टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर खांद्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 6:22 PM

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धचा चौथा टी 20 सामना जिंकून भारताने 5 सामन्यांच्या (india vs england t 20i) मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. मालिका बरोबरीत असल्याने 5 वा सामना रंगतदार होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. टीम इंडियाचा ज्युनिअर यॉर्कर किंग टी नटराजन (T Natarajan) कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. नटराजन दुखापतीतून सावरला आहे. तसेच नटराजन टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. स्वत: नटराजनने इंस्टाग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. “टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक केल्यानंतर फार चांगलं वाटलं”, अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे. नटराजनला टी 20 सीरिजआधी खांद्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती . त्यामुळे नटराजनला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. दुखापतीनंतर नटराजन बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आपल्या फिटनेसवर मेहनत घेत होता. (india vs england t 20i thangarasu natrajan is ready after injurey)

“नटराजन आता फिट”

“नटराजनने सर्व टेस्ट दिल्या आहेत. या सर्व फिटनेस टेस्ट त्याने यशस्वीरित्या पार केल्या आहेत. नटराजन काही दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये पोहचला होता. पण त्याला क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. त्याचा आज क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यामुळे तो संघासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे नटराजन पाचव्या टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे,” अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

टीम इंडिया आणखी मजबूत

नटराजनचे संघात पुनरागमन झाल्याने टीम इंडिया आणखी मजबूत झाली आहे. पाचवा टी 20 सामना हा मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. त्यामुळे नटराजनला पाचव्या सामन्यात संधी मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

नटराजनची आयपीएलमधील कामगिरी

थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. दुखापतीमुळे या 13 व्या मोसमात गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे भुवनेश्वरला या मोसमाला मुकावे लागले. भुवनेश्वर हैदराबादच्या गोलंदाजीचा कणा होता. मात्र या मुख्य गोलंदाजाच्या अनुपस्थितीत थंगारासूने उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी केली. थंगारासूने या मोसमातील एकूण 16 सामन्यात 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या.

थंगारासूला 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात समाविष्ठ करण्यात आलं. पंजाबने थंगारासूसाठी 3 कोटी मोजले. मात्र त्याला या मोसमात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यानंतर तब्बल 2 वर्षांच्या अंतराने म्हणजेच 2020 मध्ये त्याने आयपीएलमध्ये कमबॅक केलं.

संबंधित बातम्या :

Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा

T Natrajan | नटराजन प्रतिभावान खेळाडू, पण कसोटीत किती यशस्वी होईल माहिती नाही : डेव्हिड वॉर्नर

(india vs england t 20i thangarasu natrajan is ready after injurey)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.