हॉकी विश्वचषक क्वॉटर फायनलमध्ये भारतासमोर नेदरलँडचे आव्हान

हॉकी विश्वचषक क्वॉटर फायनलमध्ये भारतासमोर नेदरलँडचे आव्हान

भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी होणाऱ्या क्वॉटर फायनलमध्ये भारत नेदरलँडशी भीडणार आहे. ‘क’ गटात साखळी फेरीमध्ये आश्वासक कामगिरी केलेल्या भारतीय संघाने कॅनडाला हरवत क्वॉटर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता भारतासमोर नेदरलँडला हरवण्याचे आव्हान आहे. विश्व रँकिंगमध्ये भारताच्या एक पायरी वर म्हणजेच चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँडने ‘ड’ गटात साखळी फेरीमध्ये कॅनडाला नमवत क्वॉटर फायनलमध्ये स्थान मिळवले.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये आज या दोन्ही टीमचा एकमेकांशी सामना होणार आहे. जर भारत नेदरलँडला हरवण्यात यशस्वी ठरला तर सेमीफाइनलमध्ये प्रवेश घेईल. आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत, असे भारतीय टीमचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले.

भारतीय टीम सोबत साखळी फेरीमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची टीम बेल्जियम असूनही भारताने पहिले स्थान गाठले. भारताने दक्षिण आफ्रिकेला पाच गोलने पराभूत केलं, तर कॅनडाला 5-1 ने मात दिली. बेल्जियमसोबतचा सामना 2-2 ने ड्रॉ झाला.

भारतीय टीमच्या सिमरनजीत सिंह, ललित उपाध्याय, मनदीप सिंह आणि ड्रैग फ्लिकर अमित रोहिदास यांनी आतापर्यंत जबरदस्त खेळ दाखवला आहे.

गुरुवारी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनी विरुद्ध बेल्जियम सामना रंगणार आहे.