AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndvsNZ Live: भारताचा न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून विजय

 India vs New Zealand नेपियर (न्यूझीलंड): भारताने पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडला तब्बल 8 विकेट्सनी धूळ चारत, विजयी सलामी दिली. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला. कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीने भारताने न्यूझीलंडला 157 धावांत गुंडाळलं होतं. भारताने हे आव्हान  34.5 षटकात सहज पार केलं. भारताकडून रोहित शर्मा 11 […]

IndvsNZ Live: भारताचा न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून विजय
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

 India vs New Zealand नेपियर (न्यूझीलंड): भारताने पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडला तब्बल 8 विकेट्सनी धूळ चारत, विजयी सलामी दिली. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला. कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीने भारताने न्यूझीलंडला 157 धावांत गुंडाळलं होतं. भारताने हे आव्हान  34.5 षटकात सहज पार केलं.

भारताकडून रोहित शर्मा 11 आणि विराट कोहलीने 45 धावा केल्या. तर शिखर धवन 75 आणि अंबाती रायुडू 13 धावांवर नाबाद राहिले.

त्याआधी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने अवघ्या 157 धावांत गुंडाळलं. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स तर मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेऊन न्यूझीलंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यामुळेच न्यूझीलंडला केवळ 38 षटकात सर्वबाद 157 अशी मजल मारता आली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक 64 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

दुसरीकडे कुलदीप, शमी आणि चहलने कहर करत जबरदस्त गोलंदाजी केली. कुलदीपने 10 षटकात 39 धावा देत तब्बल 4 विकेट्स घेतल्या. तर शमीनेही टिच्चून सुरुवात करत, 6 षटकात 2 षटकं मेडन देत,19  धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. चहलने 2 तर केदार जाधवने 1 विकेट घेतली.

भारताने या सामन्यात पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि एक विकेटकीपर असा संघ मैदानात उतरवला. फिरकीची धुरा यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवकडे, तर वेगवान मारा मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार सांभाळली. त्यांना विजय शंकरच्या मध्यमगती गोलंदाजीची साथ मिळाली.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या आघाडीची फळीची दाणादाण उडवली. मोहम्मद शमीने सलामीवीर मार्टिन गप्टील (5) आणि कुलिन मुन्रो (8) दोघांच्याही त्रिफळा उडवून, किवींना बॅकफूटवर ढकललं. सलामीची जोडी माघारी परतली तेव्हा न्यूझीलंडची अवस्था 2 बाद 18 अशी होती.

यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांनी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी संयमी फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघेही सेट होत असताना, चहलने ही जोडी फोडली. रॉस टेलरला (24) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करत, चहलने भारताला तिसरं यश मिळवून दिलं. यानंतर चहलने टॉम लॅथमबाबतही मागचीच पुनरावृत्ती केली. त्यालाही स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. एका बाजूने फलंदाज माघारी परतत असताना, कर्णधार विल्यमसन मात्र दुसरी बाजू सांभाळत होता. विल्यमसनने येईल त्या फलंदाजाला हाताशी घेत स्वत:चं अर्धशतक पूर्ण करुन घेतलं. 63 चेंडूत 6 चौकारांच्या सहाय्याने त्याने 50 धावा केल्या. त्यादरम्यान केदार जाधवने हेन्री निकोल्सला 11 धावांवर बाद करत, न्यूझीलंडची अवस्था 24 षटकात 5 बाद 107 अशी केली.

मग कर्णधाराच्या साथीला मिचेल सँटेनर आला, त्याने 1 चौकार आणि 1 षटकार ठोकून 14 धावा केल्या. त्याला शमीने पायचित केलं. त्यानंतर केन विल्यमसनचाही धीर सुटला. कुलदीप यादवने विजय शंकरकरवी त्याला झेलबाद केलं. विल्यमसनने 81 चेंडूत 7 चौकारांसह 64 धावा केल्या. मग त्याच ओव्हरमध्ये कुलदीपने ब्रेसवेलला 11 धावांवर माघारी धाडून न्यूझीलंडला आठवा धक्का दिला. त्यानंतर कुलदीपनेच फर्ग्युसनला आल्या पावली शून्यावर माघारी धाडलं. धोनीने उत्तम स्टम्पिंग करुन न्यूझीलंडचा नववा फलंदाज तंबूत धाडला. मग कुलदीपनेच दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बोल्टला 1 धावेवर माघारी धाडून न्यूझीलंडचा डाव अवघ्या 157 धावात गुंडाळला.

भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी, विजय शंकर, शुबमन गिल

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन, ट्रेंट बोल्ट, डॉग ब्रेसवेल, कॉलि डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेनरी, टॉ लॅथम, कोलिन मुन्रो, हेनरी निकोलस, मिचेल सँटनर, इश सोधी, टीम साऊथी, रॉस टेलर

संबंधित बातम्या

भारत वि. न्यूझीलंड वन डे : विश्वचषकापूर्वी परदेशात भारताची अखेरची परीक्षा 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.