IND vs SA: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय (India vs South Africa) मिळवला आहे.

IND vs SA: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

India vs South Africa मोहाली : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय (India vs South Africa) मिळवला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून मात (India win by 7 wickets) केली आहे. या सामन्यात विराटने नाबाद 72 धावांची खेळी करत भारताचा विजय सुकर केला. दरम्यान या विजयामुळे भारताने या मालिका सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच (India vs South Africa) भारतीय मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला आहे.

पंजाबच्या मोहाली मैदानावर (Mohali stadium) झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मान टाकत 20 षटकात 149 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 150 धावांचे (India vs South Africa) आव्हान मिळालं.

या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवीत (India win by 7 wickets) झाल्या. मात्र त्यानंतर 11 व्या षटकात शिखर धवन 40 धावा करत बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने अवघ्या 4 धावा केल्या. यामुळे पुन्हा एकदा भारतीयांचा हिरमोड झाला.

त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रेयस अय्यरच्या मदतीने विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब (India win by 7 wickets) केला. दक्षिण आफ्रिकेकडून फेलुक्वायो, शम्सी आणि फॉर्च्युन या तिघांनी प्रत्येकी एका खेळाडूला माघारी धाडले.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटन डी-कॉक 52 आणि टेंबा बावुमा 49 धावा केल्या. हे दोघे वगळता कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. रेझा हेंड्रिग्ज आणि क्विंटन डी कॉक या जोडीने सुरुवातीच्या षटकात सावध खेळी करत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दीपक चहरच्या चेंडूवर हेंड्रिग्ज अवघ्या 6 धावा करत माघारी परतला. त्यानंतर डी-कॉकने बावुमाच्या साथीने सावध पावित्रा घेत दुसऱ्या विकेटसाठी 57 धावा केल्या. यात डी कॉकने 37 चेंडूत 8 चौकारांसह 52 धावा करत अर्धशतक केले. मात्र त्यानंतर नवदीप सैनीने त्याला माघारी धाडलं.

यानंतर टेंबा बावुमा आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या काही षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा मोठ्या समर्थपणे सामना केला. यामुळे दक्षिण आफ्रिका 149 धावांपर्यंत मजल मारु शकली. भारताकडून दिपक चहरने 2, रविंद्र जाडेजा, नवदीप सैनी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *